Advertisement

'रणांगण'च्या निमित्ताने साऊथची सुंदरी मराठी सिनेसृष्टीत!

‘मेरे रंग में रंगनेवाली’ या मालिकेनंतर प्रणालीने आपला मोर्चा साऊथकडे वळवला होता. आता ही साऊथ सुंदरी 'रणांगण' चित्रपटातून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला सज्ज झाली आहे.

'रणांगण'च्या निमित्ताने साऊथची सुंदरी मराठी सिनेसृष्टीत!
SHARES

राजश्री प्रोडक्शन्सच्या ‘मेरे रंग में रंगनेवाली’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली प्रणाली घोगरे आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘मेरे रंग में रंगनेवाली’ या मालिकेनंतर प्रणालीने आपला मोर्चा साऊथकडे वळवला होता. आता ही साऊथ सुंदरी 'रणांगण' चित्रपटातून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला सज्ज झाली आहे.



पदार्पणातच प्रणालीला सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, सुचित्रा बांदेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ चांदेकरसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली.


या तेलगू चित्रपटात चमकली

प्रणाली घोगरेने राजश्री प्रोडक्शन्सच्या ‘मेरे रंग में रंगनेवाली’ या मालिकेनंतर निखिल अडवानींच्या 'गुड्डू इंजिनिअर' या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं. त्यानंतर 'मंचुकुरीसी वेल्लालो' या तेलुगू चित्रपटातून ही मराठमोळी अभिनेत्री साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये दिसली.



राकेश सारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'रणांगण'मधून स्वप्निल जोशी आणि सचिन पिळगांकर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आता युद्ध होणार असं म्हणत स्वप्नील आणि सचिन पिळगावर यांनी ‘रणांगण’चं बिगुल फुंकलं आहे. हे रणांगणावर होणारं युद्ध  ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

'रणांगण'मधलं गुरू ठाकूरचं नवीन गाणं!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा