Advertisement

३ वर्षांचे पुरस्कार एकदाच! चित्रभूषण-चित्रकर्मी पुरस्कारांची घोषणा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१५ पासून स्थगित करण्यात आलेले तीन वर्षांचे पुरस्कार यंदा एकाच सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत.

३ वर्षांचे पुरस्कार एकदाच! चित्रभूषण-चित्रकर्मी पुरस्कारांची घोषणा
SHARES

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१५ पासून स्थगित करण्यात आलेले ३ वर्षांचे पुरस्कार यंदा एकाच सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत.

अधिकृत संस्था

मागील ५० वर्षांहूनही अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीची अधिकृत संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी चित्रभूषण आणि चित्रकर्मी हे पुरस्कार दिले जातात. मराठी चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या रूपात केला जातो, पण मागील ३ वर्षांपासून म्हणजेच २०१५ पासून हे पुरस्कार स्थगित करण्यात आले होते. काही तांत्रिक आणि महामंडळाच्या अंतर्गत अडचणींमुळं तीन वर्ष न दिलेले पुरस्कार यंदाच्या सोहळ्यात मान्यवरांना देण्यात येणार असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी संचालिका वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, चैत्राली डोंगरे, सतिश रणदिवे आदींच्या उपस्थितीत घोषित केलं आहे.

चित्रभूषण पुरस्कार

दरवर्षी दिल्या जाणाऱ्या २ पुरस्काराप्रमाणं ३ वर्षांचे मिळून एकूण ६ चित्रभूषण पुरस्कार यंदा प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, कला दिग्दर्शक श्रीकांत धोंगडे, निर्माते किशोर मिस्किन, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचा चित्रभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ५१ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

चित्रकर्मी पुरस्कार 

जीवनभर मराठी चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ मराठी चित्रपट व्यावसायिकांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल चित्रकर्मी पुरस्कार दिला जातो. दिग्दर्शक रमेश साळगावकर, संकलक संजीव नाईक, अभिनेते डा. विलास उजवणे, संगीत संयोजक आप्पा वढावकर, नृत्य दिर्ग्शक नरेंद्र पंडीत, ध्वनीरेखक प्रशांत पाताडे, संकलक दीपक विरकूड व विलास रानडे, गायक विनय मांडके, छायाचित्रण जयवंत राऊत, अभिनेता सतीश पुळेकर, अभिनेत्री प्रेमाकिरण, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेता चेतन दळवी, संगीतकार अच्युत ठाकूर, निर्मिती प्रबंधक वसंत इंगळे मुंबई विभागातील चित्रकर्मी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

सोहळ्याचं सादरीकरण

१९ आगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चित्रभूषण पुरस्कार रंगकर्मींना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार दिला जातो. आजवर एखाद्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा सादर करणाऱ्या महामंडळानं यंदा स्वत: पुढाकार घेत या सोहळ्याचं सादरीकरण करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. यासाठी नवोदितांसह अनुभवी रंगकर्मीं सेवा भावनेतून महामंडळाला सहकार्य करत आहे. या सोहळ्याद्वारे महामंडळाच्या नवोदित सदस्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं राजेभोसले यांनी सांगितलं.



हेही वाचा -

कर्जधारकांना खूशखबर! आरबीआयने केली व्याजदारांत ०.३५ टक्क्यांची कपात

सुषमा स्वराज यांचं निधन, सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा