Advertisement

आयेशाच्या आवाजात माय-लेकीच्या नात्याचं गाणं


आयेशाच्या आवाजात माय-लेकीच्या नात्याचं गाणं
SHARES

आज बरेच अमराठी गायक-गायिका मराठी सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावत आहेत. यांच्याच पावलावर पाऊल ठेवत गायिका आयेशा सय्यदनेही ‘पिप्सी’ या मराठी सिनेमासाठी गाणं गायलं आहे.

लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील 'गूज…' हे गाणं सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता या सिनेमात चिमुकल्यांच्या दृष्टीकोनातून दाखवण्यात आली आहे. या सिनेमातील 'गूज…' हे गाणं आयेशाच्या आवाजात ऐकायला मिळत आहे.


सिनेमा कधी होणार प्रदर्शित?

२७ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमातील आयेशा यांच्या आवाजातील हे गाणं ममतेचं प्रतिक आहे. माय-लेकीच्या नात्याची उबही या अंगाईत आहे.


काय आहे या गाण्यात?

हे गाणं जरी आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर आधारित असलं तरी, पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या गुराढोरांच्या काळजीनं ग्रस्त असलेल्या गरीब शेतकऱ्याची ममतादेखील यात आहे. जिवलग मित्र बाळूच्या मदतीनं ‘पिप्सी’ माश्याची आईप्रमाणं काळजी घेणारी चानीदेखील या गाण्यात आहे.


या बालकलाकारांच्या प्रमुख भूमिका

राज्य पुरस्कार विजेत्या मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या बालकलाकारांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाची निर्मिती आणि प्रस्तुती लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल यांनी केली आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' सिनेमात अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील आणि पूजा नायक यांच्यादेखील भूमिका आहेत.


हेही वाचा - 

‘उरी’च्या सेटवर विकी दुखापतग्रस्त

स्वप्नांचा प्रवास उलगडणारा ‘ट्रकभर स्वप्नं’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा