Advertisement

२ नव्हे ९ आॅगस्टला येणार जबरीया जोडी

‘एक तो हम सिंगल, उपर से कमीने’ या टॅगलाईनसह प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘जबरीया जोडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट ९ आगस्टला प्रदर्शित होणार आहे.

२ नव्हे ९ आॅगस्टला येणार जबरीया जोडी
SHARES

‘एक तो हम सिंगल, उपर से कमीने’ या टॅगलाईनसह प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘जबरीया जोडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट ९ आगस्टला प्रदर्शित होणार आहे.


प्रदर्शनाची तारीख बदलली

मागील काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘जबरीया जोडी’ या आगामी हिंदी चित्रपटाची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे. मसालेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्यानंतर या चित्रपटाबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत. अशातच निर्मात्यांनी ‘जबरीया जोडी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. त्यामुळं प्रेक्षकांना या चित्रपटाची आणखी आठवडाभर वाट पहावी लागणार आहे. पूर्वी ठरलेल्या योजनेनुसार हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २ आगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता ९ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


अनोख्या विषयावर कथानक

निर्मात्यांच्या वतीनं अधिकृतपणे ‘जबरीया जोडी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचं घोषित करण्यात आलं आहे. ९ आॅगस्ट या नव्या रिलीज डेटसह चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट अनोख्या विषयामुळं चर्चेचं कारण बनला आहे. या चित्रपटाचं कथानक एका अनोख्या विषयावर आधारित असल्यानं सर्वांचं या ‘जबरीया जोडी’कडं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट ‘पकडवा शादी’वर आधारीत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या ठिकाणी तरुणांचं अपहरण करून त्यांचं बळजबरीनं लग्न लावून देण्यात येतं. यालाच ‘पकडवा शादी’ असं म्हटलं जातं.

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत सिंह यांनी केलं आहे. एकता कपूर, शोभा कपूरसह शैलेंद्र सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, सिद्धार्थ-परीणितीसोबत जावेद जाफरी, संजय मिश्रा, अपारशक्ती खुराना, रुसलान मुमताझ, चंदर राय संन्याल, शरद कपूर आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. याखेरीज अली अवरामवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘जिला हिलैला…’ या गाण्याचा तडकाही या चित्रपटाला देण्यात आला आहे.हेही वाचा -
‘एक टप्पा आऊट’मध्ये अवतरणार विनोदाचा बादशहा

'ये रे ये रे पैसा २'चा धमाकेदार ट्रेलर लाँच
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा