Advertisement

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं घेतली जावडेकरांची भेट

वर्षाकाठी शंभरहून अधिक चित्रपट बनवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसमोरील आव्हानं मात्र अद्याप कमी झालेली नाहीत. शासन दरबारी याची दखल घेतली जावी यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रकाश जावडेकरांची भेट घेतली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं घेतली जावडेकरांची भेट
SHARES

वर्षाकाठी शंभरहून अधिक चित्रपट बनवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसमोरील आव्हानं मात्र अद्याप कमी झालेली नाहीत. शासन दरबारी याची दखल घेतली जावी यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रकाश जावडेकरांची भेट घेतली.


चित्रपटसृष्टीची सद्यस्थिती

मराठी चित्रपटसृष्टीसमोर समस्या निवारण करून मराठी चित्रपट, कलावंत, तंत्रज्ञ यांचं काम अधिक सुखकर व्हावं यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कार्यरत आहे. मराठी चित्रपटसृष्टीची सद्यस्थिती मांडत इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या काही सदस्यांनी माहिती व प्रसारण, वन व पर्यावरण, संसदीय कामकाज मंत्री प्रकाश जावडेकर यांची नुकतीच भेट घेतली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, संचालिका वर्षा उसगावकर, किरण शांताराम, चैत्राली डोंगरे आदी मंडळी उपस्थित होती.


जीएसटी रद्द

चित्रपटसृष्टीच्या इतर कामांसोबत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा हा मुद्दा यावेळी जावडेकरांसमोर प्रामुख्यानं मांडण्यात आला. यासोबतच मुंबईमध्ये अॅनिमल वेल्फेयर बोर्डचं कार्यालय सुरू करावं अशी मागणीही करण्यात आली. मराठी चित्रपटांच्या तिकिटावरील जीएसटी रद्द करावा याचाही पाठपुरावा करण्यात आला. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीनं तीन वर्षांपूर्वी एसएफसी अंतर्गत निर्मात्यांना मालिकांची निर्मिती करावयाचं आवाहन केलं होतं. त्यापैकी ३० निर्मात्यांच्या मालिका मंजूर केल्या; परंतु त्यांना अजूनही प्रसारणाची तारीख दिलेली नाही. या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासंबंधीचं निवेदनही यावेळी जावडेकरांना देण्यात आलं. यासोबतच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं.



हेही वाचा -

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी? मुख्यमंत्र्यांनी केली अमित शहांसोबत चर्चा

'बलिदान बॅज'प्रकरण: बीसीसीआय मांडणार धोनीची बाजू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा