Advertisement

गणेश यादव करतोय 'ऑनलाईन मिस्टेक'

आजच्या या ऑनलाईनच्या युगात एक जमात मात्र कायम मागासलेलीच राहिली आहे. 'ऑनलाईन मिस्टेक' या सिनेमात याच आदिवासी जमातीवर आधारित कथा पाहायला मिळणार आहे.

गणेश यादव करतोय 'ऑनलाईन मिस्टेक'
SHARES

बऱ्याचदा खलनायक किंवा ग्रे शेडेड भूमिका साकारता साकारता अभिनेता गणेश यादवने साकारलेल्या काही सकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळेच मराठीसोबतच हिंदीतही गणेशच्या नावाचा गवगवा आहे. गणेश सध्या 'ऑनलाईन मिस्टेक' या आगामी मराठी सिनेमाच्या कामात व्यग्र आहे.


आदिवासींवर कथा

आजचा जमाना ऑनलाईनचा आहे. बरेच व्यवहारही ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळं यात काही गल्लत झाली तर त्याची खूप मोठी सजा भोगावी लागते. शिवाय पश्चाताप करण्याची वेळ येते ती वेगळीच. आजच्या या ऑनलाईनच्या युगात एक जमात मात्र कायम मागासलेलीच राहिली आहे. 'ऑनलाईन मिस्टेक' या सिनेमात याच आदिवासी जमातीवर आधारित कथा पाहायला मिळणार आहे.


गावातील व्यक्तिरेखा

आदिवासी जमात कशी होती, हे लोक कुठंपर्यंत प्रवास करू शकतात आणि आयुष्यात काय करू शकतात, या विषयावर भाष्य करणाऱ्या 'ऑनलाईन मिस्टेक' या सिनेमाचं चित्रीकरण सध्या यवतमाळमधील पुसद, उमरखेड आणि कृष्णापूर गावात सुरु आहे. या सिनेमात गणेश एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यवतमाळमध्ये चित्रीकरण सुरू असलेल्या लोकेशनवरून आलेल्या फोटोमध्ये सिनेमातील गणेशचा लुक साधा असला तरी त्याची व्यक्तिरेखा कथानकात खूपच महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. पांढरा सदरा-धोतर परिधान केलेली ही व्यक्तिरेखा गावातील असल्याचं जाणवतं.


आदिवासी आणि राजघराणं 

मूळ आदिवासी कुटुंबातील असलेले अरुण किनवटकर या सिनेमाची निर्मिती करत असून, डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रज्ञा चौगुले गुरुंग यांनी संवाद लेखन केलं आहे. समाजानं दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसे नक्षलवादी बनतात याचं चित्रण या सिनेमात करण्यात येणार आहे. या चित्रपटात आदिवासी आणि राजघराणं यांच्यातील प्रेमकथा आहे. याशिवाय सिनेमातून आदिवासी समाजाची संस्कृती, गाव आणि शहर यांच्यातील समन्वयही या सिनेमात आहे.


प्रेमळ व्यक्तिरेखा 

'ऑनलाईन मिस्टेक'मध्ये महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारण्याबाबत गणेश म्हणाला की, आजवर प्रेक्षकांनी मला खलनायकाच्या भूमिकेत पाहिलं आहे, परंतु या सिनेमात मी दादासाहेब देशमुखांची भूमिका साकारतो आहे. अतिशय प्रेमळ अशी ही व्यक्तिरेखा आहे. दादासाहेबांनी आजवर अनेक आदिवासी कुटुंबीयांसाठी मदत केली आहे. इतकंच नव्हे तर ते एका आदिवासी नक्षलवादी माणसाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचा सांभाळही करतात. आदिवासींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.


डॉ. राज मानेंचं दिग्दर्शन

दिग्दर्शक डॉ. राज माने यांच्या म्हणण्यानुसार 'ऑनलाईन मिस्टेक' हा सिनेमा आदिवासी कुटुंब आणि पाटील कुटुंब यांच्यातील नातेसंबधांवर आधारित असला तरी यात अनेक उप-कथानकं आहेत. वेगळी प्रेमकथा आहे. आदिवासी तरुणांना नक्षलवादी बनण्यापासून कसं परावृत्त येता येईल हेदेखील यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं माने म्हणाले. गणेशसोबत प्रल्हाद चव्हाण, विशाल पाटील, अदिती कामले, शीतल गीते, अॅड. प्रिती मोरे, अस्मिता खटकटे, दिनकर गावंडे, अजित बिरवटकर, तुषार खेडेकर, ज्योती निसळ, रोहन पेडणेकर, साया काशिद, नयन पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत.



हेही वाचा -

मोलकरीण बाई'ला लाभलं पत्कींचं संगीत

हल्लागुल्ला करणार रसगुल्लाबाई!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा