Advertisement

हल्लागुल्ला करणार रसगुल्लाबाई!

'आम्ही बेफिकर' या आगामी मराठी चित्रपटातही असंच एक धमाकेदार आयटम साॅन्ग पहायला मिळणार आहे. या आयटम साॅन्गसाठी प्रियंका झेमसे रसगुल्लाबाई बनली आहे. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.

हल्लागुल्ला करणार रसगुल्लाबाई!
SHARES

आजच्या आयटम साँगच्या जमान्यात शीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम गर्लच्या माध्यमातून बऱ्याच अभिनेत्रींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता रसगुल्लाबाई प्रेक्षकांचं लक्ष वेधत हल्लागुल्ला करण्यासाठी येत आहे.


आयटम साॅन्ग

कथानकात वाव असेल किंवा नसेल तरी आज बऱ्याच सिनेमांमध्ये आयटम साँगसाठी एक खास जागा तयार केली जाते. मग तरुणाईवर आधारित असलेल्या एखाद्या युथफुल सिनेमात आयटम साँग असायलाच हवं. 'आम्ही बेफिकर' या आगामी मराठी चित्रपटातही असंच एक धमाकेदार आयटम साॅन्ग पहायला मिळणार आहे. या आयटम साॅन्गसाठी प्रियंका झेमसे रसगुल्लाबाई बनली आहे. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.


कोण आहे रसगुल्लाबाई?

कविश्वर मराठे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमात रसगुल्लाबाई बनलेल्या प्रियांका झेमसेबद्दल सांगायचं तर यापूर्वी तिनं बऱ्याच चॅनल्सवर व्हीजे म्हणून काम केलं आहे. याशिवाय काही वेब सीरिजही केल्या आहेत.


चटपटीत शब्दरचना

'आम्ही बेफिकीर'मध्ये रसगुल्लाबाई बनण्याबद्दल प्रियांका म्हणाली की, या गाण्याचं शूटिंग माझ्या कायम लक्षात राहील. जवळपास १० अंश डिग्री सेल्सियसपेक्षाही कमी तापमानात नाशिकमध्ये ३ दिवस या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत शूट करताना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकतेचा कस लागला. संपूर्ण टीमनं सहकार्य केल्यामुळं कडाक्याच्या थंडीतही गाणं शूट करताना खूप धमाल आली. चटपटीत शब्दरचना असलेलं हे गाणं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल, अशी आशा प्रियांकाने व्यक्त केली आहे.


सुयोग आणि मिताली यांच्या जोडीला या सिनेमात राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिलं आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिलं असून, रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

 


हेही वाचा-

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...

आपण यांना ओळखलंत का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा