Advertisement

भाऊ कदम आणणार ‘व्हीआयपी गाढव’

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा भाऊ कदम नेहमीच काहीतरी वेगळं करत आश्चर्याचा धक्का देत असतो. आता तो चक्क ‘व्हीआयपी गाढव’ घेऊन येणार आहे.

भाऊ कदम आणणार ‘व्हीआयपी गाढव’
SHARES

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा भाऊ कदम नेहमीच काहीतरी वेगळं करत आश्चर्याचा धक्का देत असतो. आता तो चक्क ‘व्हीआयपी गाढव’ घेऊन येणार आहे.

मुख्य भूमिकेत

अबालवृद्धांच्या आवडीचा विनोदी अभिनेता असलेला भाऊ कदम सहाय्यक भूमिकांकडून मुख्य भूमिकांकडं वळला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नशीबवान’ या चित्रपटात नायकाच्या रूपात भाऊनं कमाल केली होती. आता तो पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमात भाऊ पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

व्हीआयपी गाढव

ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके पॅटर्न या तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ म्हणजे विनोदाचा धमाका असल्याचं सिनेमाच्या टीमच्या वतीनं सांगण्यात येत आहे. या सिनेमाची कथा डॉ. रणजित सत्रे यांनी लिहीली असून, पटकथा डॉ. प्रसन्न देवचके यांची आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली ही गाणी संगीतकार अशोक वायंगणकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटात भाऊ सोबत शीतल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर, पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे कलाकार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. भाऊचं हे व्हीआयपी गाढव पडद्यावर काय धमाल करतं ते पहायला हवं.



हेही वाचा -

बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ३६२.०४ चौरस मीटर वाढीव जागा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा