Advertisement

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ३६२.०४ चौरस मीटर वाढीव जागा

मुंबईतल्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला इथं होणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आणखी ३६२.०४ चौरस मीटर वाढीव जागा मिळणार आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ३६२.०४ चौरस मीटर वाढीव जागा
SHARES

मुंबईतल्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला इथं होणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आणखी ३६२.०४ चौरस मीटर वाढीव जागा मिळणार आहे. त्यामुळं आता ११९१३.०५ चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरेंच स्मारक उभारलं जाणार आहे. प्रस्तावित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथे राखीव भूखंडाशेजारील जागेचा न्यायालयीन वाद निकाली निघाल्यामुळं वाढीव जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रस्तावाला सुधार समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी मिळाली आहे.

प्रशासकीय मान्यता

राज्य शासनानं महापौर बंगल्याच्या जागी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानगी यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील ऐतिहासिक महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्याबाबत मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान करार करण्यात आला आहे. या दोघांमध्ये स्मारकासाठीच्या जमीनसंदर्भात करण्यात आलेल्या या करारानुसार महापौर बंगल्याच्या ऐतिहासिक वास्तूला कुठलाही धक्का न लावता या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

जागेची भाडेपट्टी रद्द

केरलिया महिला समाज या संस्थेला महापौर बंगल्याची ३६२.०४ चौरस मीटर जागा भाडेपट्ट्यानं देण्यात आली होती. ही जागा महापौर भूभाग क्षेत्रामध्ये नसली, तरी बंगल्याला लागूनच आहे. त्यामुळं स्मारकासाठी या जागेची भाडेपट्टी रद्द करण्याची कार्यवाही पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, पालिकेच्या या निर्णयाविरोधात संबंधित संस्थेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता, मुंबई महापालिका आणि केरलिया महिला समाज यांच्यातील दावा तडजोडीने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. तसंच दावेदारांनी पर्यायी व्यवस्था स्वीकारण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं ११ जुलै रोजी संबंधित याचिका निकाली काढली असून, या संस्थेला जागेच्या बदल्यात परिसरातच पर्यायी जागा दिली जाणार आहे.हेही वाचा -

बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप

सुषमा स्वराज यांचं निधन, सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजलीसंबंधित विषय
Advertisement