नोव्हेंबरमध्ये चाखा 'खारी बिस्कीट'चा स्वाद

मराठी सिनेरसिकांना खरं तर पुढील आठवड्यात म्हणजेच २७ सप्टेंबरला ‘खारी बिस्कीट’चा स्वाद चाखता येणार होता, पण आता काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • नोव्हेंबरमध्ये चाखा 'खारी बिस्कीट'चा स्वाद
SHARE

मराठी सिनेरसिकांना खरं तर पुढील आठवड्यात म्हणजेच २७ सप्टेंबरला ‘खारी बिस्कीट’चा स्वाद चाखता येणार होता, पण आता काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांची निर्मिती असलेला खारी बिस्कीट येत्या १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खास रक्षाबंधनाच्या निमित्तानं या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि अवघ्या दोन दिवसात १० लाखाहून जास्त हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. नुकतेच या चित्रपटातील मेकिंग साँग झी म्युझिक मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात सिनेमातील लहान मुलांनी सेटवर केलेली मज्जा मस्ती अनुभवायला मिळत आहे.

'खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडणं सहाजिक आहे. याबाबत सांगायचं तर ही गोष्ट आहे चिमुरड्या भावंडांची. अवघ्या पाच वर्षांची गोंडस खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमनं साकारली आहे, तर खारी बनली आहे वेदश्री खाडिलकर. या दोघांखेरीज सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या लहानग्यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. मागील काही वर्षांपासून रोम-काम आणि ग्लॅमरस सिनेमांमध्ये रुळलेल्या संजय जाधवनं या सिनेमाच्या निमित्तानं आपला ट्रॅक बदलला आहे. प्रथमच त्यांनं दोन लहान मुलांची कथा सादर केली आहे. खरं तर ही कथा त्याला ‘दुनियादारी’च्याही अगोदर सुचली होती, पण ‘दुनियादारी’ सुपरहिट झाला आणि ‘खारी बिस्कीट’ मागे पडलं होतं.

 लिंक - https://youtu.be/6h6ehimbyfA

हेही वाचा  -

स्वराज्यातील गुप्तहेर नऊ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’

कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'
संबंधित विषय
ताज्या बातम्या