‘फर्जंद’ चित्रपटाचा कृतज्ञता सोहळा

१ जूनला प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटानं तीन आठवड्यात चांगला गल्ला जमवला असून, आता चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला मिळालेलं हे यश साजरं करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच एकत्र आली होती. या यशाला कृतज्ञतेची झालरही होती.

SHARE

एखादी कलाकृती उत्तम असेल, तर प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांकडून तिचं स्वागत होतंच. ‘फर्जंद’ हा मराठी सिनेमा त्याचं ताजं उदाहरण आहे.


यशस्वी घोडदौड...

मुहूर्तापासूनच आपलं वेगळंपण अधोरखित करणाऱ्या ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटानं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं आणि माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सर्वांच्या अपेक्षेवर खरं उतरत ‘फर्जंद’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड आजतागायत सुरू आहे.


कृतज्ञेची भावना...

१ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तीन आठवड्यात चांगला गल्ला जमवला असून, आता चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला मिळालेलं हे यश साजरं करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच एकत्र आली होती. या यशाला कृतज्ञतेची झालरही होती.


प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार...

चित्रपटाचं यश साजरं करताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्रपटाच्या टीमनं माध्यम प्रतिनिधींचा सत्कार केला. रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच, ‘चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचं समाधान’ यावेळी व्यक्त केलं.


आजही सरस...

कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’ या चित्रपटातल्या कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाचं यश नक्कीच कौतुकास्पद आहे. हा सिनेमा चौथ्या आठवड्यातही महाराष्ट्राच्या बऱ्याच चित्रपटगृहांत पाहिला जात आहे.


जय शिवाजीचा जयघोष...

‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत चित्रपटगृहं आजही ‘फर्जंद’मय झालेली पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केलं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत.


हेही वाचा - 

“नाटक पहा, आवडलं तर पैसे द्या”

शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा - फर्जंद


संबंधित विषय
ताज्या बातम्या