Advertisement

अक्षय-निखीलच्या भटकंतीचं 'गॅटमॅट'

पुण्यात सिम्बाॅयसीस ओपन इंटरनेशनल युनिव्हर्सिटीच्या आवारात या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या ठिकाणचा मनमुराद आनंद कोणाला घ्यायला आवडणार नाही असंच काहीसं अक्षय आणि निखिलसोबतही घडलं. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या प्रशस्त युनिवर्सिटीमध्ये हे दोघे कुठे न कुठेतरी फिरत असायचे. त्यामुळे, टीमला सतत त्यांना शोधावं लागायचं.

अक्षय-निखीलच्या भटकंतीचं 'गॅटमॅट'
SHARES

सेटवरील धम्माल-मस्ती कलाकारांसाठी अन् सेटवर उपस्थित असणाऱ्या तंत्रज्ञांसाठीही नवी नाही. असं असलं तरी काही चित्रपटांच्या सेटवरील धम्माल कित्येकांच्या वर्षानुवर्षे स्मरणात राहणारी ठरते आणि कालांतराने हिच धमाल आठवणींच्या रूपात मनात रुंजी घालत राहते. अशीच धमाल-मस्ती ‘गॅटमॅट’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या अक्षय टकसाळे आणि निखिल वैरागर यांनी केली आहे.


सिनेमालासुद्धा 'मिडास' टच

काही सिनेमे इतके धम्माल असतात की, त्यांचं चित्रीकरण करताना त्यातील कलाकारदेखील त्याचा पुरेपूर आनंद लुटत असतात. त्यामुळेच सिनेमालासुद्धा 'मिडास' टच येतो. असंच काहीसं झालं आहे अक्षय टंकसाळे आणि निखिल वैरागर या दोन कलाकारांच्या बाबतीत, १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'गॅटमॅट' सिनेमात प्रमुख भूमिका असलेल्या अक्षय टंकसाळे आणि निखील वैरागरने अशीच धम्माल मस्ती सेटवर केली आहे.


सिम्बाॅयसीसमध्ये भटकंती

पुण्यात सिम्बाॅयसीस ओपन इंटरनेशनल युनिव्हर्सिटीच्या आवारात या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या ठिकाणचा मनमुराद आनंद कोणाला घ्यायला आवडणार नाही असंच काहीसं अक्षय आणि निखिलसोबतही घडलं. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या प्रशस्त युनिवर्सिटीमध्ये हे दोघे कुठे न कुठेतरी फिरत असायचे. त्यामुळे, टीमला सतत त्यांना शोधावं लागायचं.


कॅम्पसमध्ये शोधाशोध

याबद्दल बोलताना 'गॅटमॅट'चे दिग्दर्शक निशीथ श्रीवास्तव म्हणाले की,' अक्षय आणि निखीलने संपूर्ण युनिव्हर्सिटी पिंजून काढली होती. कारण इथे आम्ही शॉट रेडी करत असताना हे दोघे सेटवरून गायब असायचे. कॉलेजच्या मुलांसोबत कधी हॉलीबॉल, तर कधी फुटबॉल खेळायचे, एकदा तर हे दोघे चक्क चालू लेक्चरमध्ये बसले होते आणि आम्ही त्यांना शोधण्यासाठी अखंड युनिव्हर्सिटी पालथी घातली होती.

कॉलेज विश्वावर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये अक्षय आणि निखील महाविद्यालयीन तरुणांच्या भूमिकेत दिसणार असून, यात ती तरुण-तरुणींचे 'गॅटमॅट' जुळवून देण्याचं काम करणार आहेत. त्यांसोबत रसिका सुनील आणि पूर्णिमा डे यांचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट कॉलेजविश्वाची रंजक सफर घडवणारी आहे.



हेही वाचा-

तनुश्रीचे सर्व आरोप खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर

जबरदस्त शैलीत 'मुळशी पॅटर्न'चा खतरनाक ट्रेलर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा