Advertisement

कंट्रोल न ठेवता हसायला लावणारा ‘लूज कंट्रोल’


कंट्रोल न ठेवता हसायला लावणारा ‘लूज कंट्रोल’
SHARES

गेल्या काही वर्षांमध्ये मराठीत अनेक दर्जेदार सिनेमे प्रदर्शित झाले. पण नुसती धमाल कॉमेडी असलेला सिनेमा बऱ्याच महिन्यांपासून प्रेक्षकांनी बघितलेला नाही. पण आता प्रेक्षकांना भासत असलेली ही खंत दूर होणार आहे. कारण प्रेक्षकांना लोळवून लोळवून हसवण्यासाठी, त्यांचं छप्परफाड मनोरंजन करण्यासाठी ‘लूज कंट्रोल’ची अफलातून टीम सज्ज झाली आहे!

या सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रेम झांगियानी प्रस्तुत आणि अजय सिंग दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.


चित्रपटाची कथा

रोहन मापुसकर यांनी या सिनेमाचं कास्टिंग केलं असून त्यांनी अशी टीम निवडली आहे, ज्यांना बघूनच प्रेक्षकांचे पैसे वसूल होतील. अजित साटम, रियाझ इनामदार, साकीब शेख, जिग्नेश पटेल, मिहीर भट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे.

कॉमेडीचे बादशाह मानले जाणाऱ्या एकापेक्षा एक लोकप्रिय कलाकारांनी या सिनेमात धमाल उडवून दिली आहे. काही कलाकार पहिल्यांदाच या सिनेमात काम करणार आहेत. या सर्वच कलाकारांच्या कधीही न पाहिलेल्या भूमिका प्रेक्षकांना यातून बघायला मिळणार आहेत. कॉमेडीसोबतच या सिनेमातून इमोशन, रोमान्स, मैत्री याही गोष्टी बघायला मिळणार आहेत.


कोण आहेत स्टारकास्ट?

या धमाल सिनेमात भाऊ कदम, कुशल बद्रीके, मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांत केरकर, शशांक शेंडे, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बंटावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे. तर खळखळून हसायला लावणारे संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत. रोहित नागभीडे आणि मिहीर भट यांनी धमाल संगीत दिलं आहे.



हेही वाचा

चवीसारखाच मनात रेंगाळणारा...गुलाबजाम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा