Advertisement

प्रेक्षकही म्हणतील 'Once मोअर'!

एखादा परफॅार्मंस किंवा गाणं आवडलं की आपोआप 'वन्स मोअर'ची फर्माईश येते, पण आता चित्रपटगृहांमध्येही ही फर्माईश ऐकायला मिळणार आहे. कारण 'Once मोअर' असं शीर्षक असलेला मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकही म्हणतील 'Once मोअर'!
SHARES

एखादा परफॅार्मंस किंवा गाणं आवडलं की आपोआप 'वन्स मोअर'ची फर्माईश येते, पण आता चित्रपटगृहांमध्येही ही फर्माईश ऐकायला मिळणार आहे. कारण 'Once मोअर' असं शीर्षक असलेला मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


१ ऑगस्टला प्रदर्शित

प्रत्येक नात्याची एक गंमत असते. त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं. कधीच एकमेकांना पाहिलेलं नसतानाही लग्नानंतर जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेनं रहायचं. वेळोवेळी कसोटीचे कठीण क्षणही येतात. नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ दाखवतानाच दोन युगांमधील माणसं कशी एकमेकांशी जोडली गेली असतील. त्याच्यातील संबंध, सामायिक धागा उलगडून दाखवणारा 'Once मोअर' हा चित्रपट १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


जोडप्याची कथा 

ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांची. नात्यातला गुंता अलगद सोडून आयुष्यात गंमत आणायची. 'लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट'... 'कर्म' अधोरेखित करताना कपिल आणि अंजली या जोडप्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका रहस्याचा उलगडा झाल्यानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार? या बदलाला ते कसे सामोरे जातात? याची रंजक कथा 'Once मोअर' या चित्रपटात आहे.


आजोबाच्या पुरुषी रूपात

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेला दिग्दर्शक-अभिनेता नरेश बिडकर यानं दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. आजवर नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी या चित्रपटासाठी वेगळ्या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं आहे. आजोबाच्या पुरुषी रूपात त्या आपल्याला दिसणार आहेत. ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बिडकर आदि अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात आहेत.


श्वेता बिडकरांचं लेखन

या चित्रपटाचं लेखन श्वेता बिडकर यांनी केलं आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शैलेंद्र बर्वे यांनी संगीताची तर सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील बांदोडकर, नकाश अजिज, हमसिका अय्यर या गायकांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. छायांकनाची संजय सिंग तर संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी सांभाळली आहे.हेही वाचा  -

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी

'टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा