Advertisement

पती-पत्नीमधील पूर्वजन्मीचं वैर दाखवणारा 'Once मोअर' प्रदर्शनाच्या वाटेवर

रुपेरी पडद्यावर बऱ्याचदा सत्य घटनांसोबतच काल्पनिक किंवा ऐकिवात आलेल्या ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले चित्रपटही बनत असतात. 'Once मोअर' या आगामी चित्रपटात असंच काहीसं कथानक पहायला मिळणार आहे.

पती-पत्नीमधील पूर्वजन्मीचं वैर दाखवणारा 'Once मोअर'  प्रदर्शनाच्या वाटेवर
SHARES

रुपेरी पडद्यावर बऱ्याचदा सत्य घटनांसोबतच काल्पनिक किंवा ऐकिवात आलेल्या ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले चित्रपटही बनत असतात. 'Once मोअर' या आगामी चित्रपटात असंच काहीसं कथानक पहायला मिळणार आहे.


टॅगलाईनमुळं चर्चेचा विषय 

अलिकडच्या काळात चित्रपटांच्या शीर्षकाला एका आशयपूर्ण टॅगलाईन देत आत काय दडलं आहे ते सांगितलं जातं. त्यामुळं काही चित्रपट जसे अनोख्या शीर्षकांमुळं लक्ष वेधून घेतात, तसेच काही लक्षवेधी टॅगलाईन्समुळं चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण करतात. 'Once मोअर' या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर सध्या '९०% नवरा बायको हे मागच्या जन्मीचे शत्रू असतात' या टॅगलाईनमुळं चर्चेचा विषय ठरलं आहे. पोस्टरवरच्या विविध व्यक्तिरेखेतील नामवंत कलाकार आणि त्यांचे ऐतिहासिक पेहराव यामुळं चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 


१ ऑगस्टला प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांची मांदियाळी असणारा हा चित्रपट नेमका कशावर आहे? याविषयीचे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या 'Once मोअर' या चित्रपटाच्या पोस्टरमधून भेटीला आलेल्या सर्व व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १ ऑगस्टला होईल. आजवर छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिकांमध्ये अभिनय करणारा नरेश बीडकर या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडं वळला आहे.


विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात

या चित्रपटाच्या निमित्तानं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांच्या जोडीला धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या दोन नव्या चेहऱ्यांसह रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बीडकर हे अनुभवी कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचं लेखन श्वेता बिडकर यांनी केलं आहे. संगीत शैलेंद्र बर्वे यांचं असून, छायांकन संजय सिंग यांनी केलं आहे.



हेही वाचा - 
पुनरागमन करत झीनत साकारणार सकिना बेगम

घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!

'श्री गुरुदेव दत्त' म्हणत निशिगंधा वाड आणि दिपक देऊळकर यांचं पुनरागमन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा