'अराररारा' हा कलाकार पुन्हा दिसणार 'खतरनाक' भूमिकेत

'अराररारा अराररारा खतरनाक...' या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील गाण्यानं महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. यात मन्या भाईची भूमिका साकारणारा प्रवीण तरडे पुन्हा एकदा एका खतरनाक भूमिकेत दिसणार आहे.

  • 'अराररारा' हा कलाकार पुन्हा दिसणार 'खतरनाक' भूमिकेत
SHARE

'अराररारा अराररारा खतरनाक...' या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील गाण्यानं महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. यात मन्या भाईची भूमिका साकारणारा प्रवीण तरडे पुन्हा एकदा एका खतरनाक भूमिकेत दिसणार आहे.

सध्या ट्रॅफिक नियमांचा बोलबाला आहे. सगळीकडं ट्रॅफिक नियमांचं काटेकोरपणं पालन केलं जात असताना लेखक-अभिनेता-दिग्दर्शक असं बहुआयामी व्यक्तीमत्त्व असणारा प्रवीण तरडे 'ट्रीपल सीट'वाल्यांना आपला इंगा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'मुळशी पॅटर्न'मध्ये नन्याभाईच्या भूमिकेत धमाल करणाऱ्या प्रवीणनं 'ट्रीपल सीट' या आगामी सिनेमासाठी खाकी वर्दी चढवली आहे. त्यामुळं आजवर कधी भाई, कधी ड्रायव्हर, तर कधी ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या प्रवीणला ही 'ट्रीपल सीट' पेलवते का ते पहायचं आहे.

संकेत पावसे दिग्दर्शित 'ट्रीपल सीट' या सिनेमात प्रवीणनं साकारलेल्या पोलीस इन्स्पेक्टरचं नाव दिवाने असून, याबाबतची माहिती नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. त्यामुळंच आपल्या नेहमीच्याच,ओळखीच्या शैलीत, पण पोलीसी वर्दीत प्रवीण कसा दिसेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. पोलीसांची भूमिका साकारणं प्रवीणसाठी नवं नाही. यापूर्वी त्यानं 'रेगे' या मराठी सिनेमात त्यानं साकारलेल्या पोलिसाचं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळंच 'ट्रीपल सीट'मध्ये प्रवीणनं साकारलेल्या दिवानेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'वायरलेस प्रेमाची गोष्ट' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील या कलाकारांच्या भूमिकेतील नवीन प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळणार आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद तसंच क्रिएटिव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजीत दळवी यांनी केलं आहे. गुरू ठाकूर, अश्विनी शेंडे, विश्वजीत जोशी आणि मंदार चोळकर यांनी या सिनेमासाठी गीतलेखन केलं आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश-विश्वजीत या जोडीनं दिलेला हा सिनेमा यंदा दिवाळीत म्हणजेच २४ आॅक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

‘पांडू’ उलगडणार पोलिसांचं अंतरंग

एमएक्स प्लेयरवर मोफत पहा या मराठी वेब सिरीज
संबंधित विषय
ताज्या बातम्या