Advertisement

रुपेरी पडद्यावर साधणार ‘प्रेम योगायोग’

आयुष्यातला सगळ्यात सुंदर योगायोग म्हणजे... प्रेम! कधीकधी तर हा योगायोग संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी देतो आणि प्रेमाच्या रेशीमगाठींमध्ये दोन जीवांना कायमचं बांधून टाकतो. प्रेमाचा असाच योग जुळून आलेली एक प्रेमकथा ‘प्रेम योगायोग’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

रुपेरी पडद्यावर साधणार ‘प्रेम योगायोग’
SHARES

मालिका आणि नाटकांसोबतच चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुशांत शेलारने सध्या रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. लवकरच तो मोठ्या पडद्यावर एक अनोखा योगायोग साधताना दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराची पण महत्त्वाची भूमिका असलेल्या सुशांतच्या ‘प्रेम योगायोग’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच जुहू येथील सन अॅण्ड सॅण्ड हॅाटेलमध्ये पार पडला.


प्रेमाचा योग 

मानवी आयुष्य हे सतत अनिश्चिततेच्या झुल्यावर झुलत असतं. पुढच्या वळणावर काय घडेल, कोण भेटेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. पण या अनिश्चितेतही माणसाला सुखावणारे, आनंद देणारे अनेक योगायोग घडत असतात. आयुष्यातला सगळ्यात सुंदर योगायोग म्हणजे... प्रेम! कधीकधी तर हा योगायोग संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी देतो आणि प्रेमाच्या रेशीमगाठींमध्ये दोन जीवांना कायमचं बांधून टाकतो. प्रेमाचा असाच योग जुळून आलेली एक प्रेमकथा ‘प्रेम योगायोग’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


प्रेमवीरांची कथा

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आजवर अनेकवेळा बघितली आहे.  या चित्रपटात अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची कथा पहायला मिळणार आहे. अत्यंत फ्रेश, कलरफुल, युथफुल असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी मुहर्तप्रसंगी व्यक्त केला. मराठी चित्रपट निर्मिती करीत असल्याचा आनंद होत असल्याचं मत निर्माते सुशील शर्मा यांनी व्यक्त केलं. 


कथा-पटकथा नितीन कांबळेंची

सीएमएस  एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेच्या ‘प्रेम योगायोग’मध्ये विक्रांत ठाकरे, मधुरा वैद्य या फ्रेश जोडीसोबत अरुण नलावडे, संजय मोने, शुभांगी लाटकर, तन्वी हेगडे सोबत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सुशांत शेलार दिसणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा नितीन कांबळे  यांची असून, संवाद जन्मेजय पाटील यांचे आहेत. छायांकन अनिकेत कारंजकर यांचं आहे. स्वप्नील जाधव यांनी लिहिलेल्या गीतांना राजेश सावंत, आनंद मेनन, तृप्ती चव्हाण यांचं संगीत लाभणार आहे.



हेही वाचा - 

संदीपच्या ‘कृतांत’चा टीझर सोशल मीडियावर

‘मस्का’नंतर अनिकेत-प्रियदर्शन करणार धमाल!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा