Advertisement

अगंबाई अरेच्चा! कोण आहेत हे?

'Once मोअर' या आगामी मराठी चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी हे आजोबांचं पुरुषी रूप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणी यांनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो.

अगंबाई अरेच्चा! कोण आहेत हे?
SHARES

'Once मोअर' या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक नरेश बिडकरचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... एक विचित्र स्वप्न साकार होत होतं. या चित्रपटात एक विचित्र कॅरेक्टर आहे. एका स्त्रीला पुरुष साकारायचा होता पण ते पडद्यावरचं नाटक नव्हतं, तर ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे आव्हान होतं.. आणि ते साकारण्यासाठी कसदार अभिनेत्री हवी होती.. आणि मग  'Once मोअर'च्या टीमकडून एक मुखानं नाव निघालं रोहिणी हट्टंगडी! होय, या फोटोत दिसणारे आजोबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत !!


१ ऑगस्टला प्रदर्शित

१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'Once मोअर' या आगामी मराठी चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी हे आजोबांचं पुरुषी रूप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणी यांनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो. कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला रोहिणी न्याय देऊ शकतील हा विचार करून दिग्दर्शक नरेश बीडकरनं त्यांना या भूमिकेची आवश्यकता समजावून सांगितली. भूमिकेचं आव्हान व त्यातील वेगळेपणा लक्षात घेत त्यांनीही या व्यक्तिरेखेसाठी होकार दिला.


५ तास मेकअप

कमल हसन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये गेटअप करणारे मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी 'Once मोअर' या चित्रपटासाठी रोहिणी यांना मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्यानं रोहिणी यांना आजोबांचं रूप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्या जोडीनं रोहिणी यांनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणी यांचा मेकअप करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.


भूमिकेचं आव्हान

आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणी यांना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळं या वयात रोहिणी यांनी स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. दिग्दर्शकावर दाखविलेला विश्वासही त्यांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत नरेशनं व्यक्त केला आहे. 


एन्जॅाय केलं

आजवरच्या करियरमधील ही नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी 'Once मोअर'नं दिल्याचं सांगत रोहिणी म्हणाल्या की, मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं, पण यातही एक आनंद होता. त्यामुळंच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. प्रेक्षकांनाही माझं हे रूप नक्कीच आवडेल अशी अपेक्षा रोहिणी यांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

शाहरुखचा मराठमोळा अंदाज पाहिला का?

लेव्हल खाली पाडू नकोस हीना - शिव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा