Advertisement

शाहरुखचा मराठमोळा अंदाज पाहिला का?

बॅालिवुडकरांना मराठीनं अक्षरश: वेड लावलं आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत बादशहा म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरूख खाननंही मराठीचे गोडवे गात 'स्माइल प्लीज' म्हटलं आहे.

शाहरुखचा मराठमोळा अंदाज पाहिला का?
SHARES

बॅालिवुडकरांना मराठीनं अक्षरश: वेड लावलं आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत बादशहा म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरूख खाननंही मराठीचे गोडवे गात 'स्माइल प्लीज' म्हटलं आहे.


शाहरुखच्या हस्ते लाँच 

जगण्याबाबतचा आशादायक दृष्टिकोन देणाऱ्या विक्रम फडणीस लिखित, दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी बोलताना शाहरूखनं आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, विक्रम आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. विक्रमचा फॅशन डिझायनर ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. मी विक्रमला एकदा म्हणालो होतो की, एखादा विनोदी चित्रपट बनव. त्यावर त्याचं उत्तर होतं की, हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. या चित्रपटाशी माझं भावनिक नातं आहे.


शाहरूखकडून कौतुक 

'स्माइल प्लीज'चा ट्रेलर पाहिल्यावर विक्रमच्या बोलण्याची प्रचिती आल्याचं सांगत शाहरुख म्हणाला की, विक्रम जे बोलला होता त्याची प्रचिती चित्रपटचा ट्रेलर बघताना आलीच. त्यानं हा चित्रपट खूप मनापासून बनवला आहे. चित्रपटातील कसलेले कलाकार, उत्कृष्ट पटकथा, त्याला साजेशी गाणी अशी एकंदरच मस्त भट्टी जमून आली आहे. त्यामुळं हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवून चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल असंही वेळी शाहरूख म्हणाला.      


धमाकेदार परफॉर्मन्स 

संगीतकार रोहन-रोहन आणि त्यांच्या टीमनं धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत सोहळ्यात अधिकच रंगत आणली. या वेळी प्रिया बापट, उमेश कामत, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, मानसी नाईक, पुष्कर जोग, राहुल पेठे आदी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारआणि मान्यवर उपस्थित होते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरं जाताना स्वतःला 'स्माईल प्लीज'चा संदेश देत, येणाऱ्या समस्यांचा आत्मविश्वासानं सामना करावा, हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आलं आहे. 


प्रेम, मैत्री,आयुष्य

ट्रेलरवरून हा चित्रपट नात्यातील गुंतागुंत, प्रेम, मैत्री,आयुष्य यावर भाष्य करणारा दिसतो. या सिनेमात मुक्ता बर्वे ही एक यशस्वी फोटोग्राफर असून ती तिच्या फोटोंमधून व्यक्त होत आहे. ललित हा मनमुराद आयुष्य जगणारा, स्पष्ट आणि आशावादी विचारांचा स्रोत असून, आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करत आहे. तर प्रसाद ओक कामाला प्राधान्य देणारा दाखवला आहे. या तीन भिन्न व्यक्तिमत्त्वांना जोडणारा हळुवार धागा म्हणजेच 'स्माईल प्लीज'. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाची पटकथा विक्रम फडणीस, इरावती कर्णिक यांची आहे. 

 

१९ जुलै रोजी प्रदर्शित

चित्रपटाला रोहन-रोहन यांचं संगीत लाभलं असून, मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, रोहन प्रधान, मुग्धा कऱ्हाडे यांनी गाण्यांना स्वरबद्ध केलं आहे . यापूर्वी प्रदर्शित झालेलं 'श्वास दे...' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी  नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, मिलिंद जोग यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.



हेही वाचा  -

लेव्हल खाली पाडू नकोस हीना - शिव

EXCLUSIVE : झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी मंगेशनं घेतलं उंदीर मारण्याचं ट्रेनिंग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा