Advertisement

श्रद्धा-अंधश्रद्धेच्या किनाऱ्यावरील 'सावट'!

'सावट' हा असा एक सिनेमा आहे ज्याच्या शीर्षकामागेच नव्हे, तर कथानकातही काहीतरी रहस्य दडल्याचं जाणवतं. हे रहस्य लवकरच रुपरी पडद्यावर उलगडणार आहे.

श्रद्धा-अंधश्रद्धेच्या किनाऱ्यावरील 'सावट'!
SHARES

काही चित्रपटांचं शीर्षक उत्कंठा वाढवणारं ठरतं, तर काही शीर्षकांमागे काहीतरी रहस्य दडलेलं असतं. त्यामुळेच अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सर्वांच लक्ष वेधून घेत असतात. 'सावट' हा असा एक सिनेमा आहे ज्याच्या शीर्षकामागेच नव्हे, तर कथानकातही काहीतरी रहस्य दडल्याचं जाणवतं. हे रहस्य लवकरच रुपरी पडद्यावर उलगडणार आहे.

शीर्षकावरूनच 'सावट' या चित्रपटाचा जॅानर लक्षात येतो. शीर्षकावरून तरी हा रहस्यपट असल्याचं जाणवतं. विनोदी सिनेमांच्या भाऊगर्दीत जेव्हा असा एखादा रहस्यपट प्रदर्शित होतो तेव्हा तो प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतो. बऱ्याचदा चित्रपटाचं कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात.


गुढ-थरार कथा

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या गूढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अनाउन्समेन्ट पोस्टरवर दिसणाऱ्या काळ्या-पांढऱ्या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करते. या चित्रपटात असणाऱ्या गूढ, थरारक कथेचा आणि दृश्यांचा एकंदरीत गडद अंदाज पोस्टरवरून येतो.


नकारात्मकतेचं प्रतिक

चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सौरभ सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, 'सावट'चं कथानक हे आपल्या सर्वांमधल्या नकारात्मकतेचं प्रतिक आहे. आपला समाज आपल्याला बऱ्याचदा रूढींची पडताळणी न करता त्या पाळायला भाग पाडतो. 'सावट'ची कथा श्रध्दा आणि अंधश्रध्देच्या किनाऱ्यावर असलेल्या समजूतींवर भाष्य करते. या गुढकथेमधल्या व्यक्तिरेखा या चित्तथरारक प्रवासात खिळवून ठेवतात. या चित्रपटात स्मिता तांबे , मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे, संजीवनी जाधव आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २२ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.



हिंदी चित्रपट परीक्षण : अतिरेक्यांच्या उरात धडकी भरवणारा 'उरी'

मराठी सिनेमाच्या पोस्टरवरही क्लॅाथलेस हिरो!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा