Advertisement

प्रथमेश-रितीकानं धरला ‘आपला हात जगन्नाथ…’च्या ठेक्यावर ताल

‘टाइमपास’ चित्रपटामुळं चर्चेत आल्यानंतर मराठीसोबतच हिंदीतही अभिनय करणारा प्रथमेश परब ‘टकाटक’ या चित्रपटामुळं पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आला आहे. या चित्रपटात रितीका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत त्यानं ‘आपला हात जगन्नाथ…’ या गाण्यावर ताल धरला आहे.

प्रथमेश-रितीकानं धरला ‘आपला हात जगन्नाथ…’च्या ठेक्यावर ताल
SHARES

‘टाइमपास’ चित्रपटामुळं चर्चेत आल्यानंतर मराठीसोबतच हिंदीतही अभिनय करणारा प्रथमेश परब ‘टकाटक’ या चित्रपटामुळं पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आला आहे. या चित्रपटात रितीका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत त्यानं ‘आपला हात जगन्नाथ…’ या गाण्यावर ताल धरला आहे.


नवीन जोडीची केमिस्ट्री

मिलिंद कवडेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटात प्रथमेश आणि रितीका या नवीन जोडीची केमिस्ट्री पहायला मिळणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. याच चित्रपटातील एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘टकाटक’चा ट्रेलर सोशल मिडियावर लाँच करण्यात आला. त्यानंतर या चित्रपटातील ‘आपला हात जग्गनाथ...’ हे गीत रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. खरं तर हे गाणं फार पूर्वीच लोकप्रिय झालं आहे.


आनंद शिंदेंचा आवाज

आगळ्या वेगळया धाटणीच्या नैसर्गिक आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेलं ‘आपला हात जग्गनाथ...’ हे गीत जय अत्रे यांनी लिहिलं आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. मिलिंद कवडे आणि आनंद शिंदे ही जोडी ‘टकाटक’च्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यापूर्वी या जोडीचं ‘शिनमा’ या चित्रपटातील ‘तुझी चिमणी उडाली भुर्र भुर्र, माझा पोपट पिसाटला…’ हे गाणं तूफान गाजलं आहे. आता ‘टकाटक’मध्ये ‘आपला हात जगन्नाथ…’ या गाण्यात पुन्हा या जोडीची जादू पहायला मिळणार आहे.


दणकेबाज अभिनय

हे गाणं प्रथमेश आणि रितिका यांच्यावर चित्रीत करण्यात आल्यानं त्यांच्या केमिस्ट्रीचा अनुभवही प्रेक्षकांना घेता येईल. पदार्पणातील चित्रपट असूनही रितिकानं दणकेबाज अभिनय करत प्रथमेशला उत्स्फूर्त साथ दिल्याचं ‘टकाटक’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यावरून ही जोडी आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाल्याचं जाणवतं. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात मिलिंद कवडे यांना ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांची साथ लाभली आहे.


 २८ जूनला प्रदर्शित

या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी संवादलेखन केलं आहे. हजरथ शेख (वली) यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. २८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा-

EXCLUSIVE : शनाया बनली स्कूबा डायव्हर

... तर 'बिग बॉस'च सर्वांना करतील नॉमिनेट?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा