रहस्य वाढवणारा 'खिचिक'चा ट्रेलर

फर्स्ट लुक रिव्हील झाल्यापासून 'खिचीक' या आगामी मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता या सिनेमाचा रहस्यमय ट्रेलरही लाँच झाला आहे.

SHARE

फर्स्ट लुक रिव्हील झाल्यापासून 'खिचीक' या आगामी मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता या सिनेमाचा रहस्यमय ट्रेलरही लाँच झाला आहे.


ट्रेलर लाँच 

एक छोटा मुलगा झपाटून जातो. सतत खिचिकचा शोध घेऊ लागतो, पण हे खिचिक काय रहस्य आहे ते मात्र समजत नाही. खिचिक म्हणजे नेमकं काय आहे हा प्रश्न 'खिचिक'चा ट्रेलर अधिकच गडद करतो. चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवणारा 'खिचिक'चा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. प्रीतम एस.के. पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब आजवर कधीही न पाहिलेल्या लुकमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला पॉला मॅक्ग्लिन, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, रसिका चव्हाण  बालकलाकार यश खोंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


शोधावर आधारित चित्रपट

ट्रेलर पाहून खिचिक हा चित्रपट एका शोधावर आधारित असल्याचा आपल्याला अंदाज येतो, पण या शोधालाही अनेक कंगोरे आहेत. ते काय आहेत आणि चित्रपटाची कथा कुठे कुठे घेऊन जाते याची उत्तरं चित्रपटातूनच मिळतील. मात्र मनोरंजक संवाद, दमदार अभिनय असलेल्या खिचिक विषयी उत्सुकता निर्माण होते हे निश्चित! २० सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं योगेश कोळीनं छायांकन, अमित मलकानी आणि रोहन पाटीलनं संकलन, अभिषेक-दत्तानं संगीत दिग्दर्शन, ध्वनी आरेखन राशी बुट्टे, नितीन बोरकरनं कला दिग्दर्शन, विजय गवंडेनं पार्श्वसंगीत केलं आहे. कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.  

लिंक - https://youtu.be/Ik3Knl8Ypr8हेही वाचा  -

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी

महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्ट
संबंधित विषय
ताज्या बातम्या