Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चं 'मिशन झॅप झॅप'?

'धप्पा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुलं गणेशोत्सवासाठी 'झाडं पळाली' हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात. या नाटकामध्ये ते पर्यावरण संरक्षणचा संदेश देणार असतात.

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चं 'मिशन झॅप झॅप'?
SHARES

काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे अशा चित्रपटांबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता जागृत होते. 'धप्पा' या चित्रपटानेही याच वाटेने जात कुतूहल वाढवलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ज्यात एक नवीन मिशन पाहायला मिळतं.


उत्कंठा ताणली 

"तुला माहीत आहे ना बाहेरचं जग कसं आहे?", या प्रश्नावर "बाहेरच्या जगाला सामोरं जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू". असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावं असं पालकांना वाटतं. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'धप्पा' या मराठी चित्रपटातील हा संवाद काहीतरी वेगळं सांगणारा आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं. या ट्रेलरमुळे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या, बहुप्रतिक्षित 'धप्पा'बद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.


झाडं पळाली

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात 'राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून 'नर्गिस दत्त' पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे. 'धप्पा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुलं गणेशोत्सवासाठी 'झाडं पळाली' हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात. या नाटकामध्ये ते पर्यावरण संरक्षणचा संदेश देणार असतात. 


मुलांचं मिशन

या नाटकाची लेखिका वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या मदतीने हा संदेश देण्याचा प्रयत्न करते. ज्यामध्ये येशू ख्रिस्त या व्यक्तिरेखेचाही समावेश असतो. मात्र, काही लोकांना ही बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. त्यांचे पालकसुद्धा त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. ज्या वयाच्या मुलांना 'राजकारण म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. ती मुलं या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी 'मिशन झॅप झॅप' आखतात. या मिशनचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे.


१ फेब्रुवारीला प्रदर्शित 

या चित्रपटात काही लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप या कलाकारांच्या भूमिका आहेत. 'धप्पा' या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत. हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


लिंक - https://www.youtube.com/watch?v=wcTpa9YxV-Aहेही वाचा -

विसुभाऊंच्या 'कुटुंबाची' त्रिसहस्री वाटचाल!

'नशीबवान' भाऊचं 'उनाड पाखरू...'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा