• टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
 • टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
 • टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
 • टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
 • टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
 • टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
 • टेंशन नॉट, लेट्स प्ले द साँग
SHARE

ताल, लय आणि स्वर यांच्या त्रिवेणी संगमातून जन्म होतो तो संगीताचा. संगीतहे एकप्रकारे राग आणि ताल यावर आधारीत आहे. त्यात लय आणि स्वरांचा रंग भरण्याचे काम गायक करतात. जगात असे कुणी नसेल ज्याला संगीताची भुरळ पडली नसेल. भारतीयांचे तर संगीताशी आगळे-वेगळे असेच नाते आहे. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. संगीताच्या माध्यमातून मानवी भावनांना वेगळे रूप दिले जाऊ शकते. संगीतच आपल्या मनाला शांती आणि आनंद देते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही संगीत चिकित्सेला प्राचीन काळापासून फार महत्त्व आहे.

तुम्ही कधी संगीताच्या मैफिलीला गेला आहात का? या गायन वादनाच्या मैफिलीत श्रोते सुरांशी इतके समरूप होतात की, त्यांना त्यांच्या दु:खाचा विसर पडतो. श्रोता दु:ख विसरून स्वरांतून समाधीकडे जातो. त्यामुळे, कधी जर अशा संगीत मैफलीत जाण्याची संधी मिळाली तर नक्की जा. तुमचे मन प्रसन्न होईल, याची खात्री आहे मला.

"संगीत शिकण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी कोणतं वय नसतं. आपण संगीत ऐकतो ते आपल्या मूडनुसार. सॅड असाल तर सॅड गाणी, आनंदी असाल तर आनंददायक गाणी आणि रोमँटिक मूड असेल तर, मग रोमँटिक गाणी आपण ऐकतो. कारण संगीत तुमच्या मानसिकतेवर प्रभाव पाडू शकते. संगीतामुळे तुमच्या मनाला शांती तर मिळतेच शिवाय तुम्ही आनंदी राहता. अर्थात, आनंदी राहिल्यानं तुमच्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. बोलताना अडखळणाऱ्यांना किंवा तोतरं बोलणाऱ्यांनाही संगीतामुळे फायदा होऊ शकतो. अशा लोकांमध्ये  बहुदा आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेच. मी स्वत: अशा दोघा मुलांना बोलतं करण्यासाठी संगीताचा मार्ग निवडला. आज ती मुलं बोलतच नाही तर चांगलं गातही आहेत.

- मानसी केळकर-तांबे, गायक


संगीत आणि विकार

बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञान याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. झोप न येणे, मानसिक ताण, सहनशीलता कमकुवत होणे, चिडचिड, राग ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात चिंता, थकवा, दु:ख कमी करण्याचे प्रभावी काम संगीत करते, हे संशोधनातून सिद्ध देखील झाले आहे.

लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी 'संगीत आणि विकार' या विषयावर संशोधन केले. एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, शस्त्रक्रिया करताना आणि शस्त्रक्रिया झाल्यावर जर संगीत ऐकवले तर त्याच्या शारीरिक वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात, असे या संशोधकांचे म्हणणे होते. त्यानुसार या संशोधकांच्या पथकांनी सात हजार रुग्णांवर अभ्यास केला. इतर उपचारांपेक्षा रुग्णांच्या वेदना आणि मानसिक ताण शमवण्यासाठी संगीत खूप फायदेशीर ठरल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

"मी एक चित्रकार आहे. चित्र काढताना मला म्युझिक थेरेपीचा खूप फायदा झाला. याचे कारण की, ज्यावेळेस संगीत सुरू होते तेव्हा, माझे मन स्थिर होते. एकाग्रता आणि ऊर्जा यावर माझे लक्ष केंद्रीत होते. गाणं सुरू झालं की माझं मन शब्दांकडे आपोआप वळतं. यामुळे गाण्यात गायकाच्या रचित केलेल्या भावना कॅनवासवर मला स्ट्रोकद्वारे उमटवता येतात. म्युझिकमध्ये रिदम असतो तोच रिदम मला माझ्या पेंटिंगमध्ये सापडतो"

- प्रवीण गांगुर्डे, चित्रकार

कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, डोकेदुखी, संधीवात अशा अनेक आजारांवर मात करण्यात संगीत महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारामध्ये संगीत ऐकल्यास केमोथेरपीमुळे होणारे साईड इफेक्ट्स टाळता येतात. कॅन्सरग्रस्त मुलांची काळजी घेणारी संस्था 'सेंट ज्युड्स चाईल्ड केअर सेंटर'नं म्युझिक थेरेपीचा नुकताच मुंबईत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेट लीनेही हजेरी लावली होती. संगीत थेरेपीमुळे कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात किती चांगल्या सुधारणा होऊ शकतात, याची जनजागृती करण्याचे काम 'सेंट ज्युड्स चाईल्ड केअर सेंटर' करत आहे. त्यांच्या या उपक्रमाला ब्रेट लीने देखील साथ दिली आहे.

"माझ्या बालपणातील विकासात संगीताने खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आज मी जो कोणी आहे, त्यात संगीताचा खूप मोठा वाटा आहे. मला पक्की खात्री आहे की, संगीतामुळे जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. कर्करोगग्रस्त लहानग्यांसाठी या म्युझिक थेरेपीबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे काम मी करणार आहे.”

ब्रेट ली, माजी क्रिकेटपटू

संगीतात ओम या शब्दाला देखील खूप महत्त्व आहे. मेडिटेशन करणाऱ्यांना ओम या शब्दाचे फायदे माहीत असतील, पण सर्वांनाच याचे फायदे माहीत नाहीत. ओम या शब्दाच्या उच्चारामुळे शरीरात वेगवेगळे तरंग निर्माण होऊन तुमची इंद्रिये जागृत होतात. सकाळी लवकर उठून ओमकाराचे मेडिटेशन करणे जास्त फायदेशीर आहे.


ओमकाराचे फायदे

 • ताण-तणावातून मुक्ती
 • मनाला शांती
 • थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते
 • विचार सकारात्मक होतात
 • पचनक्रिया सुधारते
 • चेहरा तेजोमय दिसतो
 • स्मरणशक्ती वाढते


संगीतातील रागांचे उपचार

संगीतात विविध राग असतात आणि हेच राग त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. संगीतातील काही राग हे मानसिक ताण दूर ठेवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहेत. म्हणजे संगीतातील राग ऐकून आपले मन शांत होऊ शकते. त्याशिवाय रागावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. उदाहरणार्थ, राग चंद्रकंस हा राग हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी उत्तम आहे. ताणतणाव घालवण्यासाठी तिलककामोद दुर्गा तर, शांत झोप येण्यासाठी राग बिहाग आणि राग बहार हे राग ऐकावेत. भारतीय संगीत शास्त्राच्या रागचिकित्सा या पुस्तकात या विषयी तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.

"म्युझिक थेरपी सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. कोणत्याही वयात तुम्ही म्युझिक थेरपीचा लाभ घेऊ शकता. हल्ली तर योगासनावेळी म्युझिक लावलं जातं. त्यामुळे मन शांत तर होतं शिवाय एकाग्रता वाढते. मी स्वत: गाणं शिकत आहे. मला याचा खूप फायदा झाला आहे. खूप सकारात्मक विचार येतात. मनातल्या भावना गाण्यातून व्यक्त करता येतात. संथ संगीत ऐकल्यानं श्वासाची गती कमी होते. एवढंच नाही तर उच्च रक्तदाब, अनिद्रा, रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्युझिक थेरपी उपयोगी आहे.”

- वंदना तुळजापूरकर


“काही वैयक्तिक कारणांमुळे मी थोडी मानसिक तणावात होती. याचा परिणाम माझ्या वागण्यावर जाणवू लागला होता. घरात खूप नकारात्मक वातावरण झालं होतं. यातून मला बाहेर पडायचं होतं. त्यामुळे २०१६ पासून मी गाणं शिकायला सुरुवात केली. याचा माझ्या व्यक्तिमत्वावर खूप चांगला परिणाम झाला. मला एक नवी दिशा तर सापडलीच पण, मला एक ओळखही मिळाली. मन शांत झालं आणि मी उत्साही राहू लागले. माझा स्वत:वरील विश्वास वाढला. २०१६ मधली प्रिया आणि २०१७ मधील प्रिया यात जमीन आस्मानचा फरक आहे. त्यामुळे म्युझिक थेरपी सर्वांसाठीच फायदेशीर आहे.”


- प्रिया मांद्रेकर

वाद्योपचाराचा फायदा


पुण्यातील वाद्यसाधक पं. मिलिंद तुळणकर हे गेल्या १३ वर्षांपासून संगीत आणि वाद्ययंत्राच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करत आहेत. ही चिकित्सा त्यांनी भारतासह १५ देशांमधील लोकांना देखील शिकवली आहे. त्यामुळे, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीरातल्या लहरींची एकसूत्रता साधण्यासाठी संगीत उपयुक्त आहे. वेगवान जीवनशैलींमुळे लहान वयात अनेक रोगांचा सामना करावा लागतो. तसंच कामातील स्पर्धा यामुळे मानसिक ताण येतो. या सर्वांवर एकच रामबाण उपाय म्हणजे संगीत. त्यामुळे गाणी ऐका आणि आनंदी राहा !

संबंधित विषय
ताज्या बातम्या