कलाकारांनी गायलं ‘सोनू...’चं विडंबन गीत

‘सोनू तुझा माझ्यावर...’ या गाण्याचं मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर भाष्य करणारं विडंबनही खूप गाजलं होतं. त्यानंतर आता गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी या गाण्याचं नवं विडंबन लिहिलं आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोले यांनी ‘दिघ्या तुझा पोलिसांवर भरवसा हाय काय...’ हे गीत लिहिलं आहे.

SHARE

एखाद्या गाजलेल्या गीताचं विडंबन करत वर्तमान काळावर भाष्य करण्याची कला फार पूर्वीपासून आपल्याकडे रुजलेली आहे. आज जग बदललं असलं तरी विडंबन काव्य मात्र आपली जागा राखून आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा याची प्रचिती येणार आहे. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय...’ या गीताचं विडंबन ‘मी शिवाजी पार्क’मध्ये पाहायला मिळणार आहे.


नवं विडंबन

सोनू तुझा माझ्यावर...’ या गाण्याचं मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर भाष्य करणारं विडंबनही खूप गाजलं होतं. त्यानंतर आता गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी या गाण्याचं नवं विडंबन लिहिलं आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोले यांनी ‘दिघ्या तुझा पोलिसांवर भरवसा हाय काय...’ हे गीत लिहिलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साटम, सतिश आळेकर आणि विद्याधर जोशी यांच्यासह महेश मांजरेकर यांनी हे गीत गायलं आहे. गायक-संगीतकार अजित परबने या गीताला स्वरसाज चढवला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट 

‘मी शिवाजी पार्क’ हा सिनेमा वर्तमानकाळात घडणाऱ्या वास्तव घटनेवर प्रकाश टाकणारा असल्याने अशा प्रकारचं विडंबनात्मक काव्य करण्याची कल्पना सुचली आणि ‘भरवसा हाय काय…’ हे गाणं या चित्रपटात आल्याचं मांजरेकर सांगतात. या चित्रपटात पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट आहे. या प्रत्येक अभिनेत्याच्या आवाजाची वेगळी ओळख आहे. प्रोफेशनल गायकांच्या आवाजात हे गाणं जर रेकार्ड केलं असतं, तर यांच्या आवाजाची जादू गाण्यात उतरवता आली नसती. यासाठी हे गाणं चित्रपटातील कलाकारांसोबतच ध्वनीमुद्रित करण्यात आल्याचंही मांजरेकर म्हणाले.


मांजरेकरांचं दिग्दर्शन

अशोक सराफ, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी पार्श्वगायन करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी इतर कलाकारांच्या आवाजात एखादं गाणं ऐकणं ही मात्र प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट ठरणार आहे. हाच या गाण्याचा मुख्य युएसपी आहे. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत.हेही वाचा-


रोहित-हृषिकेश-आनंदीचा ‘चोरीचा मामला’!

नाकातून गात मुग्धा कऱ्हाडेने केली ‘तोडफोड...’
संबंधित विषय
ताज्या बातम्या