प्रभाग एक, पक्ष 1 आणि इच्छुक 11 !

  BMC office building
  प्रभाग एक, पक्ष 1 आणि इच्छुक 11 !
  मुंबई  -  

  परळ - येथील नवीन प्रभाग क्रमांक 202 मध्ये शिवसेनेच्या 11 इच्छुक उमेदवारांमध्येच अंतर्गत चढाओढ सुरू आहेत. या 11 इच्छुक उमेदवारांपैकी माजी महापौर आणि नवीन प्रभाग 174 च्या नगरसेविका श्रद्धा जाधव आणि अॅडव्होकेट रचना अगरवाल या दोन उमेदवारांचा समावेश आहे. गेल्या 35 वर्षांपासून एक हाती शिवसेनेचा झेंडा उचललेल्या उपशाखाप्रमुख शारदा बाणेही या प्रभागामधून इच्छुक आहेत.

  याच प्रभागातून इतर 8 इच्छुक उमेदवार आहेत. यात महिला शाखा संघटक वैशाली चौधरी स्वतः साठी नव्हे तर आपल्या मुलीसाठी तिकीट मागत आहेत. त्याचबरोबर शाखा प्रमुख राजन अबिटकरही आपल्या पत्नीला तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. सदरील दोन्ही इच्छुक उमेदवारांना राजकारणातला कोणताही अनुभव नाही. पण शिवसैनिक म्हणून कार्य करतो, त्या मोबदल्यात घरातल्यांना तिकीट मिळावे, असा त्यांचा दावा आहे.

  उपशाखाप्रमुख मीरा निंबाळकर, साधना राऊळ, तृप्ती मोरे, सीमा संसारे या देखील इच्छुक आहेत. तर 206 या नवीन प्रभागाच्या नगरसेविका श्वेता राणे यांचा वॉर्ड मागासवर्ग पुरुष राखीव झाल्याने त्याही 202 प्रभागात इच्छुक म्हणून शर्यतीत उतरल्या आहेत. तर दुसरीकडे या वॉर्डमधून श्रद्धा जाधव या प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात येऊ नये यासाठी याच प्रभागातील शिवसैनिक प्रचार करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या एकाच प्रभागात एकाच पक्षाच्या 11 उमेदवारांमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.