बॉम्बस्फोटाला 24 वर्ष उलटली..पण प्रतिक्षा संपेना!

मालाड - 12 मार्च 1993 ला मुंबई हादरली होती. मुंबईत झालेल्या या बॉम्ब स्फोटामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. आता या स्फोटाला 24 वर्ष उलटून गेली तरी देखील पीडितांना न्याय मिळाला नाही. पीडित सरकारी मदतीसाठी वर्षानुवर्षे खेटे मारत असूनही त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इथे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या किर्ती अजमेरा यांनादेखील आजवर कोणतीच सरकारी मदत मिळालेली नाही. त्यांच्या शरीरात आजही काचेचे तुकडे आहेत. सरकारकडून या स्फोटातील पीडितांना आश्वासनाखेरीज अद्याप काहीच मिळालेले नाही. त्यामुळे सरकार या पीडितांकडे लक्ष तरी कधी देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading Comments