Advertisement

लखनौमध्येही साजरा होणार महाराष्ट्र दिन!

येत्या १ व २ मे रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.

लखनौमध्येही साजरा होणार महाराष्ट्र दिन!
SHARES

येत्या १ व २ मे रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार असून अलाहाबाद उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायधीश न्यायमूर्ती दिलीप भोसले व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मराठी संस्थांच्या वतीने लखनौ येथील राजभवनात याचे आयोजन करण्यात आले आहे.


गेल्या वर्षी १ व २ मे रोजी लखनौ येथील मराठी संस्थांकडून राजभवनातच महाराष्ट्र दिवसाचा सोहळा साजरा केला होता. यावेळी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण सामंजस्य करार झाला. त्या कराराचा भाग म्हणून येत्या १ व २ मे रोजीही महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे.

राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश


विविध कार्यक्रमांचे होणार सादरीकरण

महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १ मे रोजी भूपाळी ते भैरवी या संघातर्फे महाराष्ट्रातील १६ लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यात भूपाळी, ओवी, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका यावर आधारित नाट्यनृत्य यांसारख्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच २ मे रोजी 'नाट्यसंगीताची वाटचाल' हा अरविंद पिळगावकर आणि अन्य कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.



हेही वाचा

१२ मराठमोळ्या गायकांचं आगळं वेगळं 'महाराष्ट्र' गीत!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा