Advertisement

पोस्ट खात्याविरोधात तरूणांचे उपोषण


पोस्ट खात्याविरोधात तरूणांचे उपोषण
SHARES

मुंबई - पोस्टमन, एमटीएस या पदासाठी भारतीय पोस्ट खात्यातर्फे महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र त्यातील 2 हजार उमेदवारांना स्थगितीच्या नावाने नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोस्टखात्याविरोधात एक हजार उमेदवारांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे.
पोस्टमन आणि एमटीएस पदासाठी भारतीय पोस्ट खात्याच्यावतीने सन 2015 मध्ये राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, जालना, गडचिरोली,नागपूर, मराठ्यासह राज्यभरात ही भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. 2,400 मुलांची या दोन्ही पदांसाठी निवड करण्यात आली आणि त्याचे व्हेरिफिकेशन करण्यात आले. त्यांनतर त्यातील केवळ 400 मुलांना सेवेत सामावून घेण्यात आले. मात्र दोन हजार मुले रुजू होण्यासाठी गेले असता त्यांना स्थगिती देण्यात असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र , ही स्थगिती नेमक्या कोणत्या कारणामुळे आहे, हे पोस्टातील अधिकारी सांगत नाहीत. सन 2015 मध्ये सर्वच उमेदवारांनी भरतीप्रक्रिया पुर्ण केली आहे. तेव्हा भरतीत निवड झालेल्या सर्वांना सामावून घेणे गरजेचे आहे. इतरांना स्थगितीचे कारण देणे चुकीचे आहे, त्यामुळे आझाद मैदानात न्यायासाठी या तरूणांनी उपोषण सुरू केले असल्याचे उमेदवारांचे निमंत्रक प्रशांत वाघ यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा