Advertisement

आता निवडणूक स्वबळावरच... शिवसेनेची तयारी सुरू


आता निवडणूक स्वबळावरच... शिवसेनेची तयारी सुरू
SHARES

2019 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी  शिवसेनेने आतापासूनच सुरू केली आहे. ही निवडणूक स्वबळावर लढून सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने व्यूहरचना आखण्यात  शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. '2019 साठी तयार रहा' असे आदेशच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, उपनेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विशिष्ट नेतेमंडळी तसंच जुन्या नेत्यांबद्दल असलेल्या रोषाची उद्धव यांनी दखल घेतली नसल्याचं स्पष्ट झालंय. म्हणजे 2019 सालीसुद्धा शिवसेनेच्या प्रचाराची सूत्रं जुन्या नेत्यांकडेच असणार आहेत. 


यांच्यावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी 

2019ला विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेचा गड सर करण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपवली आहे. ठाणे आणि कोकण विभागाची जबाबदारी सुभाष देसाई, विदर्भ - दिवाकर रावते, उत्तर महाराष्ट्र संजय राऊत, तर सातारा, सांगली आणि कोल्हापूरची जबाबदारी गजानन कीर्तीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नेत्यांसोबत आमदार-खासदार देखील असणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


मंत्री आणि जिल्हाप्रमुखांमध्ये 'सामना' 

शिवेसेना राज्य कार्यकारिणी बैठकीत मंत्री विरूद्ध जिल्हाप्रमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आमदार, मंत्री आपले काम करत नसल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुखांनी केला. यावर खवळलेल्या राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री काय काम करतात, त्याचा रिपोर्ट उद्धव साहेबांना देत असतो. जिल्हाप्रमुख स्वत:ला काय समजतात असे खडे बोल जिल्हाध्यक्षांना सुनावले. यावर दोन्ही बाजूंनी वादावादी झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातल्या अंतर्गत धुसफुसीचा ताण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 


हेवेदावे विसरून कामाला लागा 

खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार आणि जिल्हाप्रमुखांना समज दिली. भाजपा हा शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यांनी 2019ची तयारी सुरू केली आहे. आपल्यालाही रस्त्यावर उतरून तयारी करावी लागेल. आपआपसातील हेवेदावे संपवा आणि कामाला लागा, असे आदेश या नेत्यांनी दिल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.


हेही वाचा - 

सरकार पाडण्याची ताकत कुणामध्येही नाही - मुख्यमंत्री


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा