Advertisement

सरकार पाडण्याची ताकत कुणामध्येही नाही - मुख्यमंत्री


सरकार पाडण्याची ताकत कुणामध्येही नाही - मुख्यमंत्री
SHARES

सरकार पाडण्याची ताकत कुणामध्येही नाही, आमचे सरकार स्थिर आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक बोरिवलीमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री भाषणादरम्यान फारच आक्रमक दिसले. त्यांनी विरोधकांसह सुकाणू समिती आणि मीडियावर देखील जोरदार टीका केली.


मीच मुख्यमंत्री राहणार

बातम्या कमी पडल्या म्हणून मीडिया भाजपामध्ये बदल घडणार असल्याचे दाखवत असतात. आपल्याबद्दल चांगले छापले तर त्यांची दुकाने चालणार नाहीत. पण मी महाराष्ट्रातच मुख्यमंत्री म्हणून राहणार असून, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही बदलले जाणार नाही, असे सांगत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विराम दिला.


मला कुणाची औकात काढायची नाही

शेतकरी सुकाणू समितीचा उल्लेख ‘जीवाणू’ समिती असा करत मला कुणाची औकात काढायची नाही. केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची आंदोलकांकडून मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आधीच्या सरकारसारखे बेईमान सरकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आघाडी सरकारने खोदलेले खड्डे आम्ही बुजवत आहोत. विरोधकांच्या काढलेल्या संघर्ष यात्रेतमध्ये कार्यकर्ते नसल्याची खिल्ली मुख्यमंत्र्यांनी उडवली.



हे देखील वाचा -

लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार - मुख्यमंत्री



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा