Advertisement

पावसाळी अधिवेशनात २१ विधेयकं पारित

पावसाळी अधिवेशनात विधानसभेची २० आणि परिषदेचे १ अशी एकूण २१ शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. तर, अशासकीय विधेयकांच्या ७ सूचनांपैकी ४ सूचना स्वीकृत करण्यात आल्या.

पावसाळी अधिवेशनात २१ विधेयकं पारित
SHARES

भाजपा-शिवसेना युती सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनाचा समारोप मंगळवारी झाला. या  शेवटच्या दिवशी मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी... अशा सूचक काव्यपंक्ती उच्चारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परण्याचा विश्वास व्यक्त केला. या या अधिवेशनात एकूण २१ विधेयके पारित करण्यात आली. 

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकप्रकारे समारोपाचंच भाषण केलं. ते म्हणाले की, ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करताना अडचणी, आव्हानांपासून मी पळालो नाही. तर सर्वांना सोबत घेवून, प्रामाणिकपणे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. त्याचआधारे गेल्या १५-२० वर्षांत न झालेल्या गोष्टी करून दाखवल्या. 

जयंत पाटील यांचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सभागृहात कोण येणार कोण नाही येणार याचं उत्तर शेवटी राज्यातील जनताच देणार आहे. महाराष्ट्रातील जनता चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवू शकते आणि चांगला मुख्यमंत्री हुडकूही शकते, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.   

२१ विधेयकं संमत

या पावसाळी अधिवेशनात विधानसभेची २० आणि परिषदेचे १ अशी एकूण २१ शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. तर, अशासकीय विधेयकांच्या ७ सूचनांपैकी ४ सूचना स्वीकृत करण्यात आल्या. २ सूचना विचाराधीन आहेत. सोबत १६१ पैकी १२७ अशासकीय ठरावाच्या सूचना स्वीकृत करण्यात आल्या. 

२८२५ तारांकित प्रश्न

या अधिवेशनात २८२५ तारांकित प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी ९७२ प्रश्न स्वीकारण्यात आले. ३७ प्रश्नांची सभागृहात तोंडी उत्तरे देण्यात आली. नियम ९३ अन्वये आलेल्या १३१ पैकी ८१ सूचना आल्या. त्यावर सभागृहात १४ निवदने झाली तर १६ पटलावर ठेवण्यात आली.

९५ औचित्याचे मुद्दे

या अधिवेशनात एकूण ९५ औचित्याचे मुद्दे आले. त्यापैकी २९ मांडण्यात आले. ७७२ पैकी २०५ लक्षवेधी सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी ५८ ची सभागृहात चर्चा झाली. २५६ विशेष उल्लेखांपैकी १३८ सभागृहात मांडण्यात आले. ८ पैकी२ अल्पकालीन सूचनांवर सभागृहात चर्चा झाली. 

६८ टक्के काम

१२ बैठकांच्या माध्यमातून एकूण ६८ तास ७ मिनिटे सभागृहाचं कामकाज झालं. मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची वेळ या अधिवेशनात आली नाही. दररोज सरासरी ५ तास ४० मिनिटे सभागृहाचं काम चाललं.



हेही वाचा-

महापालिका बरखास्त करून टाका- अजित पवार

मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा