Advertisement

शिवसेनेचे २३ उमदेवार बिहारच्या रिंगणात

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत २३ उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. यापैकी १० मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार थेट भाजपच्या उमेदवारांचा सामना करणार आहेत.

शिवसेनेचे २३ उमदेवार बिहारच्या रिंगणात
SHARES

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत २३ उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. यापैकी १० मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार थेट भाजपच्या उमेदवारांचा सामना करणार आहेत. हे सगळे उमदेवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाऐवजी ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या निवडणूक चिन्हावर लढणार आहेत.  

बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाला २८ ऑक्टोबरपासून सुरूवात होत असून यांत शिवसेनेचे ३ उमेदवार सत्ताधाऱ्यांशी दोन हात करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला होणार असून त्यात शिवसेनेचे ९ उमेदवार रिंगणात असतील. तर ७ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात शिवसेनेचे ११ उमेदवार लढत देतील. (23 shiv sena candidates contesting in bihar assembly election 2020)

हेही वाचा - बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह

बिहार निवडणुकीत शिवसेना ५० हून अधिक जागा लढवेल असं आधी म्हटलं जात होतं. परंतु शिवसेनेने कमी परंतु जिंकून येण्याची शक्यता असलेल्याच जागेवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. शिवसेनेने आपल्या २० स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ मोजकेच नेते प्रत्यक्ष बिहारमध्ये जाऊन प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. त्यामध्ये शिवसेना खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, कृपाल तुमाने आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे उमेदवार

मनीष कुमार (पालीगंज), ब्युटी सिन्हा (गया शहर), मृत्युंजय कुमार (वजीरगंज), संजय कुमार (चिरैय्या), रवींद्र कुमार (मनेर), संजय कुमार (फुलपराश), जयमाला देवी (राघोपूर), संजित कुमार झा (बेनीपूर), शंकर महसेठ (मधुबनी), रंजय कुमार सिंह (तरैय्या), विनिता कुमारी (अस्थवा), प्रदीप कुमार सिंह (औराई), शत्रुघ्न पासवान (कल्याणपूर), सुभाषचंद्र पासवान (बनमंखी), नवीन कुमार मल्लिक  (ठाकूरगंज), नंद कुमार (समस्तीपूर), पुष्पांकुमारी (सराय), रंजन मनीष कुमार (मोरवा), शिवनाथ मल्लिक (किशनगंज), चंदन कु. यादव (बहादुरगंज), गुंजा देवी (नरपरगंज), नागेंद्र चंद्र मंडल (मनिहारी)

त्यामुळे शिवसेनेचा तुतारी वाजवणारा मावळा बिहारच्या निवडणुकीत आपली किती छाप पाडतो, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा