Advertisement

मुंबईत ८४ हजार किलो प्लॅस्टिक जप्त

मुंबईसह (mumbai) राज्यात प्लॅस्टिकबंदी (plastic ban) लागू केली आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर आतापर्यंत मुंबईमध्ये ८४ हजार २१९ किलो प्लॅस्टिक जप्त (plastic seized) केलं आहे.

मुंबईत ८४ हजार किलो प्लॅस्टिक जप्त
SHARES

 मुंबईसह (mumbai) राज्यात प्लॅस्टिकबंदी (plastic ban) लागू केली आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर आतापर्यंत मुंबईमध्ये ८४ हजार २१९ किलो प्लॅस्टिक जप्त (plastic seized) केलं आहे. यामध्ये केलेल्या कारवाईत ४ कोटी ५४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

राज्यात प्लास्टिकबंदी (plastic ban) कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत भाजप आमदार पराग अळवणी, कॅप्टन आर सेल्वन, आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती देताना सांगितलं की, न २३ फेब्रुवारी २०१८ ते १ जानेवारी २०२० या या कालावधीत मुंबईत  ८४ हजार २१९ किलो प्लॅस्टिक जप्त करून  ४ कोटी ५४ लाख रुपयांचा वसूल करण्यात आला. 

 महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्मकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हातळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने मुंबईतील ५३ प्लास्टिक उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तर मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या भागात प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री सुरु असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.

प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याकडे अनेक आमदारांनी लक्ष वेधले आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, म्हणाले की, नुकतीच राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर व्हिडिओ कान्फरसिंगद्वारा मुंबई येथे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसंच यासाठी लवकरात लवकर या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महानगरपालिकांना कृती आराखडा तयार करुन सरकारकडे सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. 


हेही वाचा -

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार

उच्चभ्रू वसाहतीतील नव्हे तर सर्वच नाले बंदिस्त करा, नगरसेवकांची मागणी

इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये मराठी माणूसच राहावा; डबेवाला असोशिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा