Advertisement

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न


मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

येत्या काही दिवसांत मंत्रालय म्हणजे सामान्यांच्या आत्महत्येचं पॉईंट होईल की काय?, अशी भीती वाटू लागली आहे. सोमवारी रात्री उशिरा मंत्रालयाच्या परिसरात धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या पाटील यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.


का केला आत्महत्येचा प्रयत्न?

धर्मा पाटील हे शेतकरी सिंदखेडराजा येथील रहिवासी आहेत. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला खूपच कमी मोबदला मिळाल्याने त्यांनी सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मंत्रालयाच्या समोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.

धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. जमिनीचा ५ पट मोबदला देण्याचे सरकारचं धोरण असताना त्यांना केवळ ४ लाख रुपये मोबदला देण्यात आला. वाढीव मोबदला मिळावा यासाठी पाटील गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत होते. तिथे काहीच दाद न मिळाल्याने त्यांनी सोमवारी मंत्रालय गाठलं. मंत्रालयात फेऱ्या मारूनही काम होत नसल्याने निराश झालेल्या धर्मा पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा