Advertisement

शिवाजी पार्क नाही, तर ‘इथं’ उभारणार लतादीदींचं स्मारक

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याबद्दल चर्चा झाली.

शिवाजी पार्क नाही, तर ‘इथं’ उभारणार लतादीदींचं स्मारक
SHARES

महाविकास आघाडी सरकारनं मुंबईतील कलिना इथल्या मुंबई विद्यापीठाच्या (Kalina Mumbai University) जागेवर लता मंगेशकर यांचं स्मारक होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भातील वृत्त लोकमतनं दिलं आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याबद्दल चर्चा झाली. त्याअंती मुंबईतील सांताक्रुझ इथल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये लतादीदींचे स्मारक उभारण्यावर निर्णय झाला आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या जागेवर १२०० कोटी रुपये किमतीच्या अडीच एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी असणार आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक उभारावे अशी मागणी केली आहे.

राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल. यासंदर्भातील एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून स्मारक उभारण्याची भावना लतादीदींच्या सर्व चाहत्यांचीही असल्याचं कदम पत्रात म्हटलं आहे.

भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लतादीदींवर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागी शिवाजी पार्कवर गानकोकिळा लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यावधी संगीत प्रेमी व लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहेत. तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे, असंही ते पत्रात म्हणाले होते.



हेही वाचा

लता मंगेशकरांच्या स्मारकाच्या राजकारणात शिवाजी पार्कचा बळी नको- संदिप देशपांडे

लता दीदींच्या स्मारकासाठी काँग्रेस-भाजप आग्रही, पण...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा