Advertisement

वरळी-शिवडी कनेक्टरची महत्त्वाची भूमिका- आदित्य ठाकरे

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असं राज्याचे पर्यटन आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

वरळी-शिवडी कनेक्टरची महत्त्वाची भूमिका- आदित्य ठाकरे
SHARES

मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड (coastal road project) आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बांधत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असं वक्तव्य राज्याचे पर्यटन आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट देत मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे (mmrda) महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे सहाय्यक महानगर आयुक्त बी. जी. पवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम द्रूतगती महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत प्रस्तावित WEH रोड सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच तो हरित करण्याबाबत यावेळी आदित्य ठाकरे यांनी सूचना केल्या.

हेही वाचा- टेस्लाची महाराष्ट्राऐवजी बंगळुरुला पसंती, आदित्य ठाकरेंवर मनसेची टीका

नरिमन पॉईंट- कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता या व्यावसायिक व निवासी क्षेत्रातील वाहतूक सूलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

यानंतर आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी वांद्रे कुर्ला संकुल ते नंदादीप गार्डन, पश्चिम द्रृतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाची स्थळ पाहणी केली. सोबतच कंत्राटदार तसंच या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला. या स्थळ पाहणी दरम्यान प्रस्तावित धारावी टी जंक्शन ते नंदादीप उद्यान, पश्चिम द्रूतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात देखील माहिती घेतली.

आदित्य ठाकरे यांनी कलानगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. या कामांचा आढावा घेत असताना उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभिकरण, ग्रीन स्पेसमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट योजनांवरही चर्चा केली.

ही विकासकामे जोमाने सुरू असतानाच मुंबईतील (mumbai) उड्डाणपुलाखालील जागांमध्ये ग्रीन स्पेस निर्माण करणे तसंच ती जागा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी तयार करणे, अशा जागांचा उपयोग खेळण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी एकंदरीतच मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळू शकेल यासाठी व्हावा प्रयत्न करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले.

(aaditya thackeray visits mmrda office in bkc)

हेही वाचा- सीएसएमटी ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement