Advertisement

सुभाष देसाईंच्या दालनात आदित्य ठाकरेंचा फोटो

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता युवासेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हेही पूज्यनीय आहेत, असं दिसून येतंय.

सुभाष देसाईंच्या दालनात आदित्य ठाकरेंचा फोटो
SHARES

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता युवासेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हेही पूज्यनीय आहेत, असं दिसून येतंय. याचं कारण म्हणजे देसाई यांच्या कार्यालयात लावलेला आदित्य ठाकरे यांचा फोटो. 

 देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तर भिंतीवर दुसऱ्या बाजुला आदित्य ठाकरे यांचाही फोटो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये हा फोटो दिसत आहे.  बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेसाठी दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो असणं हे साहजिकच आहे. पण नुकतेच निवडून आलेले आदित्य ठाकरे यांच्या फोटोही देसाई यांच्या कार्यालयात पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. 

 धनंजय मुंडे यांनी परळीत  पंचतारांकित एमआयडीसी उभारण्यासाठी  जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश दिल्याबद्दल सुभाष देसाई यांचे आभार मानले आहेत. याबाबत एक ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. त्या ट्विटमधील फोटोत सुभाष देसाईंच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांचे फोटो स्पष्टपणे दिसत आहेत.


हेही वाचा -

राज्यमंत्रीमंडळ विस्तारात ३६ मंत्री घेणार शपथ ?

शरद पवारांच्या 'त्या' मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा