...फक्त इच्छाशक्ती हवी

  मुंबई  -  

  दादर – मुंबईकरांना परवडणारी घरं देणे शक्य आहे फक्त इच्छाशक्ती हवी असं मत शिवसेना नेते अरविंद नेरकर यांनी मुंबई लाइव्हच्या ‘मुंबई नाका’ या विशेष कार्यक्रमात मांडलं. तसेच जुन्या इमारती ताब्यात घ्या आणि 4 एफएसाय द्या असं सांगत नेरकर यांनी कागदी घोडे नाचवणे थांबायला हवेत'असं सांगितलं.

  मुंबईमध्ये परवडणारे घर या विषयावर अभिनेता जयवंत वाडकर, भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष मिलिंद तुळसकर, अर्थतज्ञ्ज अनिल गचके यांनी आपली विविध मते मांडली. आज मुंबईमध्ये सर्वसामान्य मुंबईमध्ये परवडणारे घर घेऊ शकत नाही त्यामुळे मुंबईच्या बाहेर सर्वसामान्य मुंबईकर फेकला गेल्याची प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ अनिल गचके यांनी दिली.  

  मुंबईमध्ये पोलिसांच्या कॉलनीची अत्यंत वाईट परिस्थिती असल्याचे सांगत अभिनेता जयंत वाडेकर यांनी पोलिसांच्या कॉलनी सुधारल्या पाहिजेत असं मत मांडलं. तर भाजपाचे सरकार पोलिसांना आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरं देण्यासाठी प्रयत्न करत आहे येत्या 2 वर्षांत त्याचे परिणाम दिसतील असं  भाजपाचे उपाध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री स्वत:कडे अर्बन डेव्हलपेंट का ठेवतात? असा सवाल अर्थतज्ञ्ज अनिल गचके यांनी उपस्थित करत अर्बन डेव्हलेपमेंट ही दुभती गाय असल्याचे सांगत सणसणीत आरोप केला. तसेच म्हाडाने स्वस्त घरं बांधली पाहिजेत त्याचबरोबर भाड्याने घरं देण्याची संकल्पना म्हाडाने पुन्हा सुरू केली पाहिजेत जेणेकरून मुंबईकरांना मुंबईतच राहयला मिळेल असं अनिल गचके यांनी सांगितले. त्याचबरोबर 'रेरा' अंतर्गत कायदे बनले पाहिजेत आणि महाराष्ट्रात ते कठोर पणे राबणे पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी गिरगावकरांना गिरगावमध्ये घरं मिळावी असं अरविंद नेरकर यांनी सांगत टेबला खालून देणं थांबलं पाहिजे असं अरविंद नेरकर यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.