Advertisement

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा 'हा' फोटो का होतोय व्हायरल?

2019 च्या निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी हे भाषण केले होते.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा 'हा' फोटो का होतोय व्हायरल?
SHARES

रविवारी एका मोठ्या राजकीय घडामोडीमध्ये, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत युती करून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी माझ्यासोबत आहे

शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच आपल्या निर्णयाने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी या प्रकरणाचा इन्कार केला

या संपूर्ण घटनेनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत हा अजित पवारांचा निर्णय असून पक्ष त्यांच्यासोबत नसल्याचे सांगितले. आज जे काही झाले ते राष्ट्रवादीच्या धोरणाचा भाग नाही, असे ते म्हणाले. पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊन पक्ष पुन्हा उभा करणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

जुना फोटो व्हायरल

दरम्यान शरद पवारांचा एक जुना फोटो पुन्हा व्हायरल होत आहे ज्यामध्ये शरद पवार पावसात साताऱ्यात सभेला संबोधित करताना दिसत आहेत. पवारांची सभा त्यांच्या पावसात भिजलेल्या भाषणामुळे चर्चेत आली. पवारांनी बोलायला सुरुवात करताच पावसाला सुरुवात झाली. तरीही दिग्गज नेते शदर पवार यांनी भाषण सुरू ठेवले. या फोटोनंतर शरद पवारांचीच चर्चा होती. आजही हा फोटो शदर पवारांच्या समर्थकांना लक्षात आहे. 2019 च्या निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी हे भाषण केले होते.



हेही वाचा

शरद पवारांची पुढची भूमिका काय असणार?

सत्तेच्या खेळावर राज ठाकरे कडाडले, उपस्थित केले अनेक प्रश्न

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा