'इट का जवाब पत्थरसे', आता भाजपा फोडणार काँग्रेसचे नगरसेवक?


SHARE

शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडून चमत्कार केल्यानंतर आता काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवक फोडून भाजपनेही 'इट का जवाब पत्थरसे' देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसचे हे नगरसेवक फोडण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांच्यावर सोपवण्यात आली असून एक तृतीयांश नगरसेवकांचा हा गट तयार करून हे नगरसेवक फोडण्यात येतील असं समजतंय.

भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपाची एक जागा व निवडून आल्यानंतर त्यांनी पुढील सहा महिन्यांमध्ये राजकीय समीकरणे जुळवून आणण्याची रणनीती भाजपाने आखली होती. परंतु शिवसेनेने, मनसेचे ६ नगरसेवक फोडल्यानंतर भाजपने आपली राजकीय रणनिती आता अधिक मजबूत केली आहे.


राणे, राजहंस यांच्यावर जबाबदारी

नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत एनडीएत सामील होण्याची तयारी दर्शवली आहे. नारायण राणे यांचे महापालिकेत किमान ५ ते ६ समर्थक नगरसेवक असून त्या नगरसेवकांसह काही नगरसेवकांना भाजपात आणण्याची जबाबदारी राजहंस सिंह यांच्याकडे दिल्याचं समजतंय.


अशी फोडणार काँग्रेस

काँग्रेसचे सध्या ३० नगरसेवक असून त्यातील १० ते १२ नगरसेवकांचा एक गट फोडल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचा हा गट फोडून त्यांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळत आहे.


संख्याबळात पुढे जाणार?

त्यामुळे मनसेच्या ६ नगरसेवकांसह शिवसेना ९१ वर पोहोचली असली, तरी भाजपा काँग्रेसच्या या नगरेसेवकांना आपल्या पक्षात घेऊन शिवसेनेच्या पुढे संख्या नेण्याचा विचार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी उलाढाल पाहायला मिळणार असून शिवसेना आपली सत्ता टिकवते की भाजपा त्यांच्याकडून हिरावून घेते, हेच पहायचं आहे.हेही वाचा -

ऐतिहासिक! पक्षांतरबंदी कायद्यानंतर महापालिकेत पहिल्यांदाच फुटले नगरसेवक

कसली एकनिष्ठा? जाणून घ्या, मनसेची साथ सोडणाऱ्यांची राजकीय पार्श्वभूमी

थिअऱ्यांचं राजकारण आणि जनतेलाच मुरडा!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय