Advertisement

जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय; अजितदादांनी दिला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायची इच्छा व्यक्त केली होती.

जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय; अजितदादांनी दिला पाठिंबा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच एका यू ट्युब चॅनलला मुलाखत देताना मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक पाठिंबा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला निमित्त मिळालं आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या या मुलाखतीत जयंत पाटील (jayant patil) यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, नक्कीच मला मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा आहे. आमच्या पक्षाकडे अजूनही मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटतंच, त्यानुसार जशी इच्छा सगळ्यांना असेल, तशी मलाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहेच. परंतु आमच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतात, तोच आमच्यासाठी अंतिम असतो, असं जयंत पाटील म्हणाले होते. 

हेही वाचा- दंडेलशाहीने वीजबिल वसूल कराल, तर राज्यात उद्रेक होईल- प्रविण दरेकर

त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा आहे, त्यावर तुमचं मत काय असं विचारलं असता, जयंत पाटलांनी जी काही इच्छा प्रदर्शित केली आहे त्याला मी पाठिंबा देतो, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

सोबतच अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रियी दिली. सरकारमध्ये कुठलाही एक मंत्री मोठा निर्णय घेत नसतो. तर संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेत असतं. कोरोना (coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या तिजोरीची अवस्था पाहता सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

(ajit pawar backs jayant patil for cm post in maharashtra)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा