Advertisement

'सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करा', भाजपा आक्रमक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वासमान्यांचा लोकल प्रवास बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळं प्रवासी, प्रवासी संघटना आणि अनेक स्थानिक नेते आंदोलन करत आहेत.

'सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करा', भाजपा आक्रमक
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वासमान्यांचा लोकल प्रवास बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळं प्रवासी, प्रवासी संघटना आणि अनेक स्थानिक नेते आंदोलन करत आहेत. अशातच, सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी आता भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत शुक्रवारी भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात यासाठी ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर आंदोलनास सुरूवात झाली आहे. चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालं आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषबाजी करण्यात येत आहे. तर, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं दिसत आहे. शिवाय, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं गेलं आहे. चर्चगेट, दहिसर घाटकोपर या ठिकाणी आंदोलनास सुरूवात झाली आहे.

'लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?' असा सवाल दरेकरांनी राज्य सरकारला केला आहे.

लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता मा. न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु मा. न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का? मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र सरकार विरोधात शुक्रवारी सकाळी १० ते ११ या दरम्यान मुंबईच्या सर्व स्थानिक रेल्वे स्थानकांवर आंदोलन करतील, असे काल कळवण्यात आले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा