Advertisement

कधी कधी प्रमाणपत्राची गरज लागते, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरांच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे.

कधी कधी प्रमाणपत्राची गरज लागते, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
SHARES

मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावरून भाजपने मंगळवारी राज्य सरकारला घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. 

वाह प्रशासन - बार आणि दारूची दुकाने खुली, तर मंदिरं डेंजर झोनमध्ये? नक्कीच काही वेळा प्रमाणपत्राची गरज लागते, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. 

मंदिराच्या प्रश्नावरून आक्रमक होत भाजप नेत्यांनी मंगळवारी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांबरोबरच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्त्वाची आठवण करून देत मंदिरं खुली करण्याबाबत विचारणा केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत दिलेलं उत्तर साेशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं.

हेही वाचा - ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, भाजपचं आंदोलन

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसतखेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का?

असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिल्यानंतर भाजप नेत्यांचा तिळपापड झाला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा