Advertisement

सुप्रिया सुळेंचे भावनिक ट्विट

'आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे हे सर्व पाहायला हवे होते'

सुप्रिया सुळेंचे भावनिक ट्विट
SHARES

राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार आहे. काही तासातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपत घेणार आहे. त्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांची आठवण काढत एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे.

मागील दोन आठवड्यांपासून सत्तास्थापनेचा सुरू असलेल्या पेच अखेर काही तासांपूर्वी सुटला. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादींनी एकत्र येत मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार, आज उद्धव ठाकरे शिवतिर्थावर सायंकाळी ६.४० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे हे सर्व पाहायला हवे होते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला मिळाले नाही. त्यातूनच सत्तास्थापनेसाठी चढाओढ निर्माण झाली. राज्याच्या राजकारणात एका मागोमाग एक घडणाऱ्या हालचालींमुळे राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत केले. महत्वाचे म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रुपात महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबियांचा पहिला मुख्यमंत्री मिळणार आहे. यातच सुप्रिया यांनी केलेले ट्वीट लक्ष केंद्रीत करणारे ठरले आहे. "माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल". असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.


हेही वाचाः- नाराज एकनाथ खडसे देणार पक्षाला सोडचिठ्ठी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा