मालाडमध्ये शौचालयावरून रंगला श्रेयवाद

Malad
मालाडमध्ये शौचालयावरून रंगला श्रेयवाद
मालाडमध्ये शौचालयावरून रंगला श्रेयवाद
See all
मुंबई  -  

मालाड - लिंक रोड परिसरात महापालिकेच्या जागेवर पे अँड युज शौचालय आणि स्नानगृह बांधण्यात आले आहे. या शौचालयाच्या विकासकामावरून श्रेयवाद सुरू झाला असून दोन नगरसेवकांमध्ये जुंपली आहे. या शौचालयावर काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा आणि मनसेचे नगरसेवक दिपक पवार यांच्यात श्रेयाची लढाई रंगली आहे.

राभडिया सेवक संघ आणि महापालिकेने भागिदारी तत्त्वावर पे अँड युज शौचालय बांधले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मालाडचे आमदार असलम शेख यांनी या शौचालयाचे उदघाटन केले. त्यावर आमदार असलम शेख आणि स्थानिक नगरसेवक परमिंदर भामरा यांचा बोर्ड लावण्यात आला. त्यानंतर काही दिवसांतच मनसेचे नगरसेवक दिपक पवार यांनी शौचालयाचे काम त्यांच्या प्रयत्नाने झाल्याचे फलक लावले.

"शौचालयासाठी राभडिया सेवा संघ आणि मी पाठपुरावा केला होता. त्यामुळे हे काम माझ्या प्रयत्नाने झाले असल्यामुळे माझ्या नावाचा फलक लावल्याचे नगरसेवक दिपक पवार यांनी सांगितले. मात्र काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.