Advertisement

अंसारींना धक्का, पण गिरकरांचे विजयाचे पंचक


अंसारींना धक्का, पण गिरकरांचे विजयाचे पंचक
SHARES

मुंबई - महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 223 मधून एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवार वकारुनिस्सा अंसारी आणि भाजपाच्या उमेदवार शैलजा गिरकर हे सलग पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. पण यंदा काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे वकारुनिस्सा अंसारी यांनी एआयएमआयएम यांच्याकडून उमेदवारी मिळवली. परंतु या प्रभागात माजी विरोधीपक्षनेते ज्ञानराज निकम यांची कन्या निकीता यांनी सलग चारवेळा निवडून आलेल्या वकारुनिस्सा अंसारी यांचा पराभव केला. तर सलग चारवेळा निकम यांनी आपल्या गडात विजय मिळवत वकारुनिस्सा अंसारी यांना पराभवाचे पाणी पाजले. तर कांदिवलीतून सलग चार वेळा निवडून आलेल्या माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत विजयाचे पंचक ठोकले. श्रद्धा जाधव आणि राम बारोट यांच्यानंतर महापालिकेत शैलजा गिरकर या सर्वात ज्येष्ठ नगरसेविका आहेत.

चौकार ठोकणारे नगरसेवक
शिवसेना - रमेश कोरगावकर
भाजपा - उज्जवला मोडक






Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा