Advertisement

“लसीकरणात महाराष्ट्र मागे पडल्यानेच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं”

राज्य सरकारने सर्वसामान्यांना थेट लाॅकडाऊन लावण्याचा इशारा दिलेला असतानाच लसीकरणात महाराष्ट्र मागे पडल्यानेच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

“लसीकरणात महाराष्ट्र मागे पडल्यानेच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं”
SHARES

एकीकडे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने सर्वसामान्यांना थेट लाॅकडाऊन लावण्याचा इशारा दिलेला असतानाच लसीकरणात महाराष्ट्र मागे पडल्यानेच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आशिष शेलार (ashish shelar) यांनी सांगितलं की, लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांच’ लसीकरणच झालं नाही. सरकार अपयशी! महाराष्ट्रात रडव्यांचं रडगाणे सुरुच राहिलं आणि पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं!

हेही वाचा- “बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत”, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

महाराष्ट्रात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचे आकडे किती वाढताहेत, कसे वाढताहेत याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरीत स्पष्टीकरण द्यावं. माझा आरोग्यमंत्र्यांना सवाल आहे की त्यांच्याच मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री नवाब मलिक लसीबद्दल आणि लसीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. दुष्प्रचार करतात, जनतेत गैरसमज पसरवतात, त्याचे परिणाम असे दिसतात की आजही साडेचार लाख आरोग्य सेवेतील फ्रंट लाइन वर्कर यांना अजूनही लस मिळालेली नाही. लसीकरणात त्यांचा सकारात्मक सहभाग नाही. नवाब मलिक यांनी पसरवलेल्या गैरसमजामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे का, त्यावर आरोग्यमंत्री काय कारवाई करणार, यावर त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अशी आमची विनंती आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

तत्पूर्वी, राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही. ही अतिशय चिंतेची बाब आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी. तर सर्वसामान्यांनीही मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिला होता.

(ashish shelar blames maharashtra government for slow covid 19 vaccination)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा