Advertisement

भायखळ्याला पेंग्विन पहायला यायचं हं.., आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

भायखळ्यातील राणीची बाग देखील सुरू होत असल्याने भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेताच शिवसेनेला चिमटा काढला आहे.

भायखळ्याला पेंग्विन पहायला यायचं हं.., आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
SHARES

ठाकरे सरकारने कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यावर काही बंधने टाकली आहेत. यामुळे आयता मुद्दा हाती आलेल्या भाजप नेत्यांकडून सरकारवर कडाडून टीका करण्यात येत आहे. याच दरम्यान भायखळ्यातील राणीची बाग देखील सुरू होत असल्याने भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी नाव न घेताच शिवसेनेला चिमटा काढला आहे.

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर.. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!!  ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!!

तर, बार, रेस्टॉरंट, हॉटेल, पब, नाईट लाईफची चिंता करणाऱ्या राज्य सरकारची शिवजयंतीवर बंधने. हिंदू समाज सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेला सरकारकडून कार्यक्रमासाठी पायघड्या मात्र छत्रपती शिवरांयाच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला बंधने राज्य सरकार घालते, अशा शब्दांत भाजप (bjp) नेत्यांनी सरकारवर टीका केली होती.

हेही वाचा- भाजपच्या विरोधानंतर शिवजयंतीच्या नियमात बदल, 'अशी' आहे नवी नियमावली

राज्य सरकारने याआधी शिवजयंती साजरी करण्यासाठी १० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घातलेली होती. परंतु भाजपच्या विरोधानंतर ही मर्यादा वाढवून १०० जणांच्या उपस्थितीवर नेण्यात आली.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक, इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचं केबल नेटवर्क अथवा आॅनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. 

तसंच कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून फक्त १०० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं मार्गदर्शक नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे.

(ashish shelar criticized thackeray government over shivjayanti guidelines in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा