Advertisement

'दानवेंना सत्तेची धुंदी चढलीय'


'दानवेंना सत्तेची धुंदी चढलीय'
SHARES

सीएसटी - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केलीय. सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंना धुंदी चढलीय. त्यामुळे त्यांना राज्यातल्या शेतक-यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ दिसला नाही, अशी बोचरी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

“गेल्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता," असे वक्तव्य करणाऱ्या दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध अशोक चव्हाण यांनी केली. राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त
शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली. काँग्रेस पक्षाने संसद, विधानसभा आणि रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांना 4 हजार 200 कोटींची तुटपुंजी मदत केली. काँग्रेस पक्षाला या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून असे वक्तव्य करणे दुर्देवी असून दानवे यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे चव्हाण यावळी म्हणाले.

या असंवेदनशील वक्तव्याबाबत दानवे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. तसेच लक्ष्मीदर्शनाच्या गप्पा मारणा-या रावसाहेब दानवे यांनी किती लोकांना जुन्या नोटा बदलून दिल्या? महाराष्ट्र प्रदेश भाजपाने जुन्या नोटांच्या माध्यमातून काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत का? याचीही चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा